घरताज्या घडामोडीगोळ्या घ्या पण कामावर या... मधुमेही, ह्दयविकारग्रस्तांना एसटी महामंडळाची तंबी!

गोळ्या घ्या पण कामावर या… मधुमेही, ह्दयविकारग्रस्तांना एसटी महामंडळाची तंबी!

Subscribe

राज्य शासनाने कोरोना काळात 55 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना, तसेच अतिजोखमीचे आजार असलेल्या कामावर न बोलविण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळ अशा कर्मचार्‍यांना कामावर सर्रासपणे बोलवित आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने काही सुचना दिलेल्या होत्या. मात्र एसटी महामंडळ या सुचनांकडे कानाडोळा करत असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्य शासनाने कोरोना काळात 55 वर्षांहून अधिक वय असलेल्यांना, तसेच मधुमेह, ह्दयविकार,अस्थमा यासारख्या अतिजोखमीचे आजार असलेल्या कामावर न बोलविण्याच्या सुचना दिल्या होत्या. मात्र एसटी महामंडळ अशा कर्मचार्‍यांना कामावर सर्रासपणे बोलवित आहे. त्यामुळे या कर्मचार्‍यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. यासंबंधीची माहिती देऊनही एसटी महामंडळ कामगारांची काळजी घेत नसल्याने आता  महामंडळाची तक्रार राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे कर्मचार्‍यांनी केली तक्रार

गेल्या साडेतीन महिन्यापासून कोरोनामुळे एसटी महामंडळाच्या बसेसचे चाक थांबले आहे. त्यामुळे महामंडळाला कोटयवधी रुपयांचा तोटा झालेला आहे. लॉकडाउुनपासून फक्त एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे आणि पालघर विभागाची वाहतूक सुरु आहे. कामगारांच्या सुरक्षिततेची काळजी न घेतल्यामुळे या तिन्ही विभागत 250 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. आता तर एसटी  कामगारांसाठी काम नसल्यामुळे या कठीण परिस्थितीत आर्थिक बचतीसाठी महामंडळाने कर्मचार्‍यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यास सुरुवात केली आहे. सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या कर्मचार्‍यांमध्ये तरुणांची संख्या जास्त असल्याने वयस्कर कर्मचार्‍यांना कामावर यावे लागत आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचार्‍यांचामध्ये महामंडळाविरोधात प्रंचड नाराजीचे वातावरण आहे. राज्य शासनाने सर्व शासकीय कार्यालये आणि महामंडळे यांना सुचना दिल्या होत्या की, 55 वर्षांहून अधिक वय असलेल्या कर्मचार्‍यांना कामावर बोलवू नयेत, तसेच  ज्या  कर्मचार्‍यांना मधुमेह, ह्दयविकार, अस्थमा, कर्करोग असे अतिजोखमीचे आजार आहेत, त्यांना घरी बसण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून यासूचनांकडे एसटी महामंडळाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

कर्मचार्‍यांच्या आरोग्याशी खेळणे थांबवा

एसटी महामंडळाच्या चिपळूण आगारातील चालक सुर्यकांत माने यांचे  सध्या वय ५७ वर्षे आहे. लवकरच ते निवृत्त होणार आहेत. माने हे मधुमेह, थाईरॉईट, उच्च रक्तदाब या व्याधींनी ग्रस्त  आहे. तरीसुध्दा त्यांना  कामावर बोलविण्यात येत आहे. शासनाने कोरोनासारख्या भयंकर वैश्विक महामारीत जे वयस्कर व विविध आजाराने ग्रस्त असतील, त्यांची काळजी घेण्याचा सुचना केल्या होत्या. मात्र एसटी महामंडळाकडून त्यांकडे कानाडोळा करत आहे. चालक सुर्यकांत माने यांनी यासंबंधी तक्रार मुख्य मंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -