स्कूल व्हॅन उलटून चिमुरडीचा मृत्यू, ८ विद्यार्थी जखमी

गोंदिया जिल्ह्याच्या भानपूर गावात स्कूल व्हॅनला अपघात झाला आहे. या अपघातात एका चार वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातील चालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Gondia
latur accident
प्रातिनिधिक फोटो

गोंदिया जिल्ह्याच्या गंगाझरी येथील एम.आय. डी.सी. रोड वर आज सकाळी अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेत एका चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला असून आठ विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना गोंदिया येथील बाई गंगा बाई शासकीय स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या चिमुरड्यांवर सध्या उपचार सुरु आहेत.

असा घडला अपघात

गोंदिया जिल्ह्याच्या भानपूर गावात स्कूल ऑफ इंटिलीजन्स शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांन शाळेत सोडण्यासाठी स्कूल व्हॅन लावण्यात आली होती. मात्र हा चालक संस्था चालकाच्या नियमाची पायमल्ली करीत स्कूल व्हॅन ऐवजी गावातील एक खाजगी टाटा सुमो भाड्यावर घेत शाळेत मुलांना नेण्याआणण्यासाठी वापरायचा. तसेच या गाडीचा दर आठ पंधरा दिवसात चालक देखील बदलत होता. त्यामुळे पालकांची दिशाभूल होत होती. मात्र आज सकाळी नेहमीप्रमाणे चालक स्कूल व्हॅन घेऊन आला. मुलांना सेसगाव आणि मुंडीपार गावातून घेत भानपुरच्या दिशेने निघाला असता तिरोडा -गोंदिया एम आय डीसी रोड वर पोहोचला. त्यादरम्यान स्कूल व्हॅनच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून व्हॅन उलटली. या अपघातात नैत्री मेंढे या चार वर्षीय चिमुरडीचा त्याच गाडीखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर आठ विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर गोंदियाच्या बाई गंगाबाई शासकीय स्त्री रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता सर्व विद्यार्थी सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली असून स्कूल संचालकावर कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली आहे. तर पसार असलेल्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.


वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर दोन अपघात; २ जणांचा मृत्यू


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here