घरमहाराष्ट्रकोंबड्याच्या खुराड्यात शिरला बिबट्या; वनविभागाने केले जेरबंद

कोंबड्याच्या खुराड्यात शिरला बिबट्या; वनविभागाने केले जेरबंद

Subscribe

अन्नाच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीकडे येण्याच्या घटना वारंवार घडत आहे. जुन्नरमध्ये चक्क बिबट्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरला. वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद केले.

शिकारीच्या शोधात बिबट्या मानवी वस्तीत येत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. मानवी वस्तीत शिरुन पाळीव प्राण्यांवर आणि माणसांवर हल्ले करण्याच्या घटना घडत आहे. मात्र आज पहाटेच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील आईनेवाडी या गावातील किरण कैलास अहिंनवे या शेतकऱ्याच्या घराच्या बाजुला असणा-या कोंबड्यांच्या खुरड्यात कोंबड्यांची शिकार करत असताना बिबट्या कैद झाला. अखेर वनविभागाने घटनास्थळी धाव घेत बिबट्याला जेरबंद केले.

- Advertisement -

हेही वाचा – जुन्नरमधील ‘तो’ बिबट्या अखेर जेरबंद


कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या

मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यात शिरला. कोंबड्यांचा आवाजाने बिबट्या शिकारीच्या हेतुने कोंबड्यांच्या खुरड्यात शिरला खरा मात्र त्याला त्यामधून बाहेर पडता येत नव्हते. बिबट्या आल्यामुळे आईनेवाडी गावात आणि आसपासच्या परिसरात नागरिकांची धावपळ सुरु झाली. दरम्यान बिबट्याची माहिती वनविभागाला देण्यात आली त्यानंतर वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी आणि माणिकडोह बिबट निवारा केंद्राची टीम घटनास्थळी दाखल झाली.

- Advertisement -

बिबट्याला केले बेशुध्द

बिबट्याने रात्रभर अनेक कोंबड्यांना खाल्ले. वनविभागाच्या टीमने बिबट्याला बेशुद्ध केले. हा बिबट्या २ वर्षाचा असल्याचे डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले. बिबट्याला शेवटी कोंबड्यांच्या खुराड्यातून बाहेर काढुन माणिकडोह बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि शेतक-र्यांनी सुटकेचा श्वास घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -