घरमहाराष्ट्रमुंढेंची पुन्हा बदली मात्र आता नवीन पोस्टिंग नाही

मुंढेंची पुन्हा बदली मात्र आता नवीन पोस्टिंग नाही

Subscribe

मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे अपिल आणि सुरक्षा

एकीकडे कंगना रानौत आणि सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र निर्माण झालेले असतानाच या गोंधळात राज्य सरकारने बदल्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. राज्यात अजून ७ वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये बहुचर्चित अशी तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करून त्या ठिकाणी दुसर्‍या अधिकार्‍याची बदली करण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून बदल्यांचे राजकारण केले जात असल्याचे आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. मात्र, त्याला न जुमानता राज्य सरकारने बदल्या करणे सुरूच ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच ‘बदल्या करणे हा राज्य सरकारचा अधिकारच आहे’, अशी ठाम भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मांडली होती.

कुणाची कुठे झाली बदली?
१) किशोर राजे निंबाळकर, सचिव, मदत व पुनर्वसन यांना सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. याच पदावर काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. ती रद्द करण्यात आली आहे.
२) एम. जे. प्रदीप चंद्र यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ, नागपूर या रिक्त पदावर करण्यात आली आहे.
३) ई. रवींद्रन यांची नियुक्ती सह विक्रीकर आयुक्त, विक्रीकर विभाग, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
४) मनुकुमार श्रीवास्तव यांची बदली मंत्रालयात अपील आणि सुरक्षा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून करण्यात आली आहे. तर सीताराम कुंटे यांच्याकडे गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा कार्यभार राहणार आहे.
५) कैलाश शिंदे यांची बदली नवी मुंबई सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक पदावर करण्यात आली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -