घरमहाराष्ट्रबुलढाणामध्ये दोन बालकांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

बुलढाणामध्ये दोन बालकांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

Subscribe

बुलढाणामध्ये दोन बलाकांचा कारमध्ये गुदमरून मृत्यू झाला आहे. तर एका चिमुकली प्रकृती गंभीर आहे. चिमुकलीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

बुलढाण्यामध्ये कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एका पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे. या चिमुकलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तीनही बालके एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे हा घातपात आहे की अपहरण याचा तपास बुलढाणा पोलीस लावत होते. मात्र, पोलिसांच्या तपासात हा कुठलाही घातपात किंवा अपहरणाचा प्रकार नसून ती मुले कारमध्ये लॉक झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर लहान बालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मुंबईच्या गोरेगावमध्ये देखील एका तीन वर्षीय चिमुकल्याचा गटारात पडून मृत्यू झाला आहे. याशिवाय वरळी आणि धारावीत देखील पालकांच्या हलगर्जीपणामुळे मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मरण स्वस्त झालं आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो.

काय आहे नेमकं प्रकरण?

सोमवारी दुपारपासून तीनही बालके बेपत्ता होती. विशेष म्हणजे ही तिघेही एकाच कुटुंबातील होती. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना प्रचंड शोधले. मात्र तरीही तिघांचा पत्ता लागला नाही. अखेर कुटुंबियांनी बुलढाणा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना सुरुवातीला अपहरणाची शक्यता वाटत होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासादरम्यान, एका सेंट्रो कारच्या काचेवर चिमुकलीचा हात दिसला. गाडीजवळ गेल्यावर तिघेही बालके तिथे सापडले. या तिघांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात गेल्यावर दोन्ही मुलांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. सध्या मुलीवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – धारावीत नाल्यात पडून चिमुरड्याचा मृत्यू!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -