घरमहाराष्ट्रमी तीन चाकी कार नाही सरकार चालवतो

मी तीन चाकी कार नाही सरकार चालवतो

Subscribe

विरोधकांच्या टीकेला उत्तर

मला दुचाकी चालवण्याची सवय नाही; पण सध्या तीन चाकी कार नाही, तर सरकार चालवतो आहे. जे सुसाट होते, ते आपटले अशा शब्दांत विरोधकांच्या या टीकेला मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. सोमवारी 31व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन केले. नरिमन पॉईंट येथे एनसीपीएमधील जमशेद भाभा थिएटरमध्ये पार पडलेल्या या उद्घाटन समारंभावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. जमशेद भाभा थिएटर, एनसीपीए, नरिमन पॉईंट येथे परिवहन विभाग, अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य व मुंबई पोलीस वाहतूक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 31 वा राज्य रस्ता सुरक्षा सप्ताह 2020 चे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री आपल्या भाषणात विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला सडेतोड उत्तर देण्यात आले आहे. विरोधकाकंडून महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना हे तीन चाकी सरकार असल्याचा वारंवार उल्लेख केला जातो. शिवाय शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केल्याने हे सरकार टिकणार नाही, अशी टीका केली जाते. या टीकेवर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की, मी कार नाही, तर सरकार चालवत आहे. दोन्ही ठिकाणी बॅलेन्स महत्त्वाचा असतो. तो मी साधला आहे.

- Advertisement -

आमच्यावर तीन चाकी सरकार असल्याची टीका होत आहे. तीन चाकी तर तीन चाकी पण आमचं सरकार चालत आहे, ते महत्त्वाचे आहे. समतोल जमला पाहिजे मग दोन चाकं असो किंवा तीन चाकं असो. चार चाकं असूनही आपटायचे ते आपटले आहे, असा टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकाला लगावला आहे.

कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही
चीनच्या तुलनेत भारतातील वाढत्या अपघातांवर उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली. उद्धव म्हणाले की, 2005 साली चीनमध्ये 94 हजार, तर भारतात 98 हजार अपघातांची नोंद झाली होती. याउलट 14 वर्षांनंतर 2019 मध्ये चीनमध्ये केवळ 45 अपघातांची नोंद झाली आहे. याउलट देशातील अपघातांनी दीड लाखांचा टप्पा गाठला आहे. अपघात वाढवणारी प्रगती आम्हाला नको. त्यामुळे परिवहन विभागाने त्यांना हवी ती यंत्रणा आणि सुविधा उभारावी, त्यांना वाट्टेल ती मदत सरकार करेल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. सुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी सरकार परिवहन विभागाला कोणतीही गोष्ट कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -