घरताज्या घडामोडीCoronavirus: हॉटेल-मेस बंद म्हणून नागरिक चिंतेत; युवक काँग्रेसचा मदतीचा हात

Coronavirus: हॉटेल-मेस बंद म्हणून नागरिक चिंतेत; युवक काँग्रेसचा मदतीचा हात

Subscribe

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून गरजुंसाठी पार्सल स्वरूपात जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

करोना विषाणूच्या भीतीने संपूर्णपणे विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने मदतीचा हात पुढे केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसरकारने सर्व दुकाने, कार्यालये, खानावळी आणि हॉटेल्स बंद ठेवल्या आहेत. परिणामी शिक्षण आणि रोजगारासाठी शहरात राहणारे युवक, विविध इस्पितळात इतर रुग्ण इत्यादींच्या जेवणाची गैरसोय होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून गरजुंसाठी पार्सल स्वरूपात जेवणाची व्यवस्था मानस पगार यांच्या पुढाकाराने पुण्यात सुरू केली आहे.


हेही वाचा – आता ३१ मार्च नव्हे, पुढील आदेश येईपर्यंत सध्याचे निर्णय लागू, अजित पवारांची घोषणा!

- Advertisement -

करोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे जीवन सुकर करण्यासाठी जनतेला मदत करण्यासाठी इतर महानगरे आणि शहरात
पर्यायी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले आहे.

आज रात्री ८.३० वाजता अहिल्या अभ्यासिके शेजारी, शास्त्री रोड, पुणे या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी पार्सल जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून अधिक माहितीसाठी युवक काँग्रेसला संपर्क करा.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -