घरमुंबईएलएलएमच्या निकालात ९६ टक्के विद्यार्थी नापास

एलएलएमच्या निकालात ९६ टक्के विद्यार्थी नापास

Subscribe

फक्त ४.३ टक्के विद्यार्थी झाले उत्तीर्ण ,मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका

एलएलएमच्या पहिल्या सेमिस्टर परीक्षेमध्ये जवळपास 96 टक्के विद्यार्थी अनुतीर्ण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी अनुतीर्ण झाल्याने पेपर तपासणीमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे नियम धाब्यावर बसवल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापकांची कमतरता व उपलब्ध प्राध्यापकांची गुणवत्ता याकडे विद्यापीठांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे एलएलएमच्या पहिल्या सेमिस्टरचा निकाला खराब लागल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. निकाल कमी लागल्यामुळे याप्रकरणी कॉलेज व प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

एलएलएम करणार्‍या विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. एलएलएमच्या पहिल्या सेमिस्टरच्या परीक्षेला १ हजार ३५ विद्यार्थी बसले होते. यामधील केवळ ८७ विद्यार्थी उतीर्ण झाले आहेत. या निकालाची टक्केवारी ४.३ टक्के आहे. त्यामुळे एवढा कमी निकाल कसा लागला, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या निकालाची चौकशी करण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये नेट परीक्षासाठी पात्र ठरणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ५ आहे.

- Advertisement -

ही सर्व परिस्थिती पाहता मुंबई विद्यापीठाच्या युजीसीकडून पेपर तपासणीसाठी आणि प्राध्यापकांच्या निवडीसाठी ठरवलेल्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. युजीसीच्यावतीने २0१६ मध्ये लागू केलेल्या नियामावलीचे पालन विद्यापीठाकडून करण्यात येत नाही. पीएचडीसाठी आवश्यक असलेली प्लॅगरीजम अहवाल मुंबई विद्यापीठ तपासत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा परिणाम होत असल्याचे आरोप संदीप केदारे यांनी केला आहे.

55 टक्क्यांना टॉपर
मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम परीक्षेचा टॉपर ५५ ते ५८ टक्के दरम्यान असतो. त्यातुलनेत अन्य विद्यापीठाचे टॉपर ६८ ते ७0 टक्के असतात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची कामगिरीही अत्यंत दयनीय आहे.

- Advertisement -

एलएलएमच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये अनुतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी संबधित प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी.
– अ‍ॅड. संदीप केदारे, सामाजिक कार्यकर्ता

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -