घरताज्या घडामोडीकसाबला 'बिर्याणी' घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची 'बिर्याणी' खाताय; आशिष शेलारांची सरकारवर टीका

कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय; आशिष शेलारांची सरकारवर टीका

Subscribe

'मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला 'बिर्याणी' घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची 'बिर्याणी' खाताय', अशी टीका आमदार अँड आशिष शेलार यांनी सरकारवर केली आहे.

‘मुंबई आणि महाराष्ट्राबाबत कोणी पाकिस्तान आणि अन्य काही उल्लेख करील तर त्याच्याशी आम्ही बिलकुल सहमत नाही. मात्र, रस्त्यावरच्या खड्यांवर बोलणाऱ्या रेडिओ जॉकी मलीष्काच्या घरात आणि कंगना रौनातच्या घरात पालिका अधिकारी घुसवलेत ना? भारत तेरे तुकडे हो हजार, असे म्हणणाऱ्या उमर खालिद गँगला मुंबईत येण्यास कधी रोखले नाहीत ना? त्यांच्या कार्यक्रमात सोबत बसायला निघाला होतात ना? गेट वे ऑफ इंडियाला आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या देशविरोधी मेहक प्रभूच्या घरात पालिका कधी घुसवली नाहीत ना? कर्तबगार मुंबई पोलिसांवर, मुंबईकरांवर गोळ्या झाडणाऱ्या कसाबला ‘बिर्याणी’ घालणाऱ्यांसोबत तुम्ही सत्तेची ‘बिर्याणी’ खाताय ना? याकूबच्या फाशीला विरोध करणाऱ्यालाच मुंबईचा पालकमंत्री केलेत ना? बेईमानी, तळतळाट हे तुम्हालाच तर लागत नाहीत ना? बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, अशा शब्दांत आमदार अँड आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे.

‘कंगणा रानौत यांचे बांधकाम अनधिकृत होते तर एक महिन्यांपूर्वी, एक वर्षांपूर्वी महापालिकेने कारवाई का केली नाही? त्यामुळे पालिका आणि राज्य सरकारने आजची केलेली कारवाई ही सुड बुध्दीने केलेली कारवाई आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे. ‘आमच्या बरोबर याल तर वाचवू आणि आमच्या विरोधात गेलात तर घरात घुसून ठोकून काढू’, असे ठोकशाहीचे वर्तन राज्यातील ठाकरे सरकारचे आहे हे आज दिसून आले, असेही आमदार अँड आशिष शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

तसेच सामनातून करण्यात आलेल्या टिकेला उत्तर देताना ते म्हणाले की, ‘बात हरामखोरीची निघाली तर मग ‘डांबराने’ लिहीले जाईल’, असे ‘मुंबईकरांना बरेच आठवेल. १०६ हुतात्म्यांना गोळ्या घालणाऱ्या काँग्रेस सोबतच सत्तेत बसलात ना? मुंबई मातेचा अपमान कोण करतय? बेईमानी नेमकी कोण करतय? हुतात्म्यांचे तळतळाट तुम्हाला तर लागणार नाही ना? ऐवढे तपासून पहा! मुंबई साखळी बाँम्ब स्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांना मारणाऱ्या टायगर मेमनच्या माहिमच्या घरात, आँफिसमध्ये महापालिका बुलडोझर घेऊन घुसवलीत होती का?,’ असा सवाल उपस्थित केला आहे.


हेही वाचा – ‘कंगनाने मुंबईत येऊन शिवसेनेचं नाक कापलं’, राणेंचा हल्ला

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -