घरमुंबईविक्रोळीतील ‘त्या’ रस्त्यांचा मार्ग मोकळा; १० वर्षांनी अतिक्रमण हटवलं

विक्रोळीतील ‘त्या’ रस्त्यांचा मार्ग मोकळा; १० वर्षांनी अतिक्रमण हटवलं

Subscribe

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गासाठी हटवण्यात आलेल्या बांधकामांमधील लोकांचे पुनर्वसन एमएमआरडीएने केल्यानंतरही त्याठिकाणी दोन अनधिकृत बांधकामांनी महापालिकेच्या रस्त्याची वाट अडवून ठेवली होती. तब्बल १० वर्षे न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे या बांधकामांवर महापालिकेला कारवाई करता येत नव्हती. अखेर या प्रकरणातील एका बांधकामाच्या विरोधात निकाल लागताच ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी धडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे विक्रोळी पूर्वेकडे जाणार्‍या परेश पारकर मार्ग आणि पिरोजशा गोदरेज मार्ग दरम्यान ६० फूट रुंदीचा विकास नियोजन रस्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

फक्त २ बांधकामांमुळे अडचण!

मुंबईतील मध्ये रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या विस्तारीकरणा दरम्यान विक्रोळी पूर्व परिसरातील नामदेव पाटणे मार्गालगतची बांधकामे २००५ मध्ये पाडून त्यांचे पुनर्वसन एमएमएआरडीएमार्फत करण्यात आले. यांपैकी काही जणांनी पर्यायी जागांचा ताबा घेतानाच, पुन्हा जुन्याच जागी अतिक्रमण केले होते. ही सर्व अतिक्रमणे महापालिकेच्या ताब्यात येणार्‍या विकास नियोजन रस्त्यावर होती. त्यामुळे महापालिकेने एकूण २७ अतिक्रमणांपैंकी २५ अतिक्रमणांवर कारवाई करून बांधकामे हटवली. परंतु दोन बांधकाम धारकांनी न्यायालयात धाव घेत स्थगिती मिळवली होती. त्यामुळे या बांधकामांचे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. परंतु, यांपैकी एका बांधकामाबाबत न्यायालयाने नुकताच महापालिकेच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे परिमंडळ ५ चे उपायुक्त देवेंद्र कुमार जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या पथकाने या बांधकामावर धडक कारवाई केली. या कारवाईत ५ हजार चौरस फुटांच्या जागेवर असलेले अनधिकृत बांधकाम हटवण्यात आल्याची माहिती संतोषकुमार धोंडे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -