Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई १६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

१६ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लसीकरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

Related Story

- Advertisement -

मुंबईत १६ जानेवारीला कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी पालिका यंत्रणा सज्ज झाल्याची माहिती पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. पालिकेच्या केईएम, सायन, नायर, व्ही. एन. देसाई, वांद्रे भाभा, कुर्ला भाभा, राजावाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, बीकेसी कोरोना जंबो सेंटर आदी ९ ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

लसीकरणासाठी ७२ बूथ असणार आहेत. प्रत्येक बुथवर नर्ससह प्रत्येकी आरोग्य कर्मचारी असणार आहेत. तसेच, प्रत्येक ५ बुथसाठी एक डॉक्टर असणार आहे. या बुथवर एका शिफ्टमध्ये किमान १०० जणांना लस देता येणार आहे. दोन शिफ्टमध्ये आरोग्य कर्मचारी लसीकरण करणार आहेत. एका दिवसाला किमान १४ हजार लोकांना लस देण्याची आपल्या आरोग्य यंत्रणेची क्षमता आहे, अशी माहिती मंगला गोमारे यांनी दिली. तसेच, पालिकेने लस साठविण्यासाठी कांजूरमार्ग येथील आरोग्य केंद्राची निवड मध्यवर्ती लस साठवणूक केंद्रासाठी केली असली तरी या केंद्राचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आता लसीचा साठा हा एफ/दक्षिण येथील लस साठवणूक केंद्रात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

देशात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्या तीन टप्प्यात आरोग्य क्रमचारी आणि फ्रंट लाईन कर्मचारी यांना लस देण्यात येणार आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. लसीकरणाचा हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचारी यांना लस दिली जाईल. त्यानंतर ५० वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती; तसंच बहुव्याधी असलेल्या ५० वर्षांखालील व्यक्ती यांना लसीकरणात प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यांची एकत्रित संख्या सुमारे २७ कोटी असल्याचेही सरकारी निवेदनात म्हटलं.

 

- Advertisement -