घरमुंबईआघाडीच्या भूमिकेत बदल वंचित आघाडीला ६ जागा

आघाडीच्या भूमिकेत बदल वंचित आघाडीला ६ जागा

Subscribe

लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरुन काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला स्वल्पविराम लागला असताना दोन्ही पक्षांनी आपल्या भूमिकेत बदल केल्याची माहिती समोर आली आहे. हे बदल करताना आता वंचित आघाडीला ही स्थान देण्याचा चाचपणी सुरु झाली असून त्यासाठी त्यांना ६ जागा सोडण्याची तयारी सुरु केल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची चाचपणी सुरु केलेली आहे. सध्या या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपावरुन चर्चा सुरु झालेली आहे. पण प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला यात सामील करण्याची नवी चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी मुंबई येथील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली होती. या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, काँग्रेस नेते आणि विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ आदी नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर वरील निर्णय घेतल्याचे कळते.

- Advertisement -

या बैठकी दरम्यान झालेल्या चर्चेत वंचित आघाडीला 6 जागा देण्याची तयारी दाखवली आहे. सुरुवातीपासून फक्त अकोल्याची एकच जागा सोडू अशी भूमिका घेणार्‍या दोन्ही काँग्रेसच्या भूमिकेत हा मोठा बदल झाला आहे. तर सुरुवातीला सहा जागांच्या मागणीनंतरही प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभेच्या किमान 12 आणि विधानसभेच्या 24 जगांचा आग्रह धरल्याची चर्चा आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात वंचित आघाडीच्या सभाही पार पडल्या. या सभांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याने दोन्ही पक्षांनी भूमिकेत बदल केल्याचे कळते. तर दुसरीकडे हे दोन्ही पक्ष प्रकाश आंबेडकर यांना आघाडीत येण्याचे आवाहन करीत असले तरी एमआयएमला सोबत घेण्यास काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध होता. याविषयी बोलताना ओवेसी म्हणाले होते की, एमआयएम नको असेल तर मी आघाडीतून बाहेर पडायला तयार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमधील महाआघाडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा सध्या राजकीय क्षेत्रात सुरु झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -