घरCORONA UPDATEधारावीनंतर मुंबईतला हा परिसर ठरतो कोरोनाचा हॉटस्पॉट

धारावीनंतर मुंबईतला हा परिसर ठरतो कोरोनाचा हॉटस्पॉट

Subscribe

आता धारावी त्यातुलनेत नियंत्रणात येताना दिसत असून या उलट माहिमकरांमध्ये कोरोनाची बाधा अधिक होत असल्याचे समोर येत आहे.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील धारावीकडे सर्वांचे लक्ष असले तरी आता धारावी त्यातुलनेत नियंत्रणात येताना दिसत असून या उलट माहिमकरांमध्ये कोरोनाची बाधा अधिक होत असल्याचे समोर येत आहे. शनिवारी धारावीमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा आकडा खाली आला असून माहिममध्ये सर्वांधिक ४१ रुग्ण आढळून आले आहेत.

महापालिकेच्या जी-उत्तर विभागातील माहिम, धारावी आणि दादर या तिन्ही विभागांमध्ये दिवसभरांत ७४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये तीन दिवसांपूर्वी धारावीमध्ये आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा पुन्हा शनिवारी दिसून आला. शनिवारी याठिकाणी १८ रुगण आढळले. तर मागील दोन दिवशी याठिकाणी ३८ आणि ४१ रुग्ण आढळून आले होते. त्यापूर्वी १८ रुग्ण होते. शनिवारीही माटुंगा लेबर कॅम्पमध्ये काही रुग्ण आढळले. तर धारावी आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे धरावीतील मृतांचा आकडा ७१ वर पोहोचला आहे.

- Advertisement -

तर माहिममध्ये दिवसभरात ४१ रुग्ण आढळले. रहेजा रुग्णालय,माहिम पोलिस वसाहत आदींमध्ये बाधित रुग्ण आढळून येत असून याशिवाय आरोग्य तपासणी माध्यमामातून रुग्णांचा शोध घेतला चाचणी केली जात आहे. त्यामुळे माहिममधील रुग्णांची संख्या वाढत असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.तर दादरमध्ये दिवसभरात १५ रुग्ण आढळून आले आहेत.

जी-उत्तर विभागातील रुग्ण आणि मृतांची आकडेवारी

धारावी : एकूण रुग्णांची संख्या : १७३३, मृत : ७१

- Advertisement -

माहिम : एकूण रुग्णांची संख्या : ४८४, मृत :  ०९

दादर : एकूण रुग्णांची संख्या :  ३०९, मृत :  १०

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -