घरमुंबईविहिरीत पडलेल्या गाईला वाचविण्यात यश

विहिरीत पडलेल्या गाईला वाचविण्यात यश

Subscribe

मोकाट गुरांचा मुरुड मध्ये सुळसुळाट असुन कोटेश्वरी, पोलीस ठाणे, तहसिल कार्यालय येथील रस्त्यावर विशेषतः रात्रीच्या वेळी गुरांचा बिनदिक्कत वावर असतो. याच दरबार रोड वर साजिद मिस्री यांच्या घरासमोरील 30 फुट खोल विहिरीत एक गाय काल रात्री दीडच्या पडल्याची घटना घडली. विहिरीवर प्लायवून टाकलेले होते, त्यावरून घसरून ही गाय आत पडली.

विहीरीला पाणी कमी असल्याने गाय बुडाली नाही. सदरहु बाब नगरसेविका मुग्धा जोशी यांना कळताच त्यांनी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना तातडीने बोलावले. घटनास्थळी निशान मुकादम हे जेसीबीसह रवाना झाले. त्यानंतर विहिरीत शिडी सोडली. बाळा तांबुलकर यांनी प्रसंगावधान राखुन नगरपरिषदेचे कर्मचारी अशोक तुळसकर, सिताराम पतेने, अविनाश अवधुत, विनायक तळेकर, नयन शिंदे, अभिजित कारभारी आदींनी जेसीबीच्या सहाय्याने तब्बल नऊ ते दहा तासांनी दोरखंडाला बांधून गायीला विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. बाहेर काढताक्षणी गाईच्या अंगावर पाणी ओतले असता गाय सुरक्षित असल्याचे लक्षात आले.

- Advertisement -

आठ दिवसापूर्वी विजेच्या खांबाचा शॉक लागुन एक बैल मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतांना ही दुसरी दुर्घटना घडली. या ही घटनेत गाईचा मालक कोण ? हे गुलदस्यात आहे . मुरुड नगरपरिषदेने मोकाट गुरांचा बंदोबस्त करून कोंडवाडा वा पांजरपोळात ही जनावरे पाठवावी अशी नागरिकांची मागणी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -