घरमुंबईदया नायक यांना पोलीस निरीक्षकपदी बढती

दया नायक यांना पोलीस निरीक्षकपदी बढती

Subscribe

आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद बड्डा नायक ऊर्फ दया नायक यांना पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. बढतीनंतर त्यांना मुंबई शहरात बदली दाखविण्यात आली असून लवकरच त्यांना नियुक्ती जाहीर केली जाईल असे सांगण्यात आले. विशेष म्हणजे याच वर्षी त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली होती, त्यानंतर आता पोलीस निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पाच सहाय्यक पोलीस निरीक्षकांना गुरुवारी रात्री बढती देण्यात आली आहे. त्यात विलास शिवाजी जाधव, दया नायक, शिवाजी डोईफोडे, जयंत गंगावणे आणि गोरखनाथ गांगुर्डे यांचा समावेश आहे. बढतीनंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. मात्र बदलीचे ठिकाण अद्याप जाहीर करण्यात आले नाही. दया नायक हे सध्या आंबोली पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.

- Advertisement -

गेल्या दीड ते दोन वर्षांत त्यांनी ड्रग्ज तस्कराविरुद्ध धडक मोहीम सुरु केली होती. आतापर्यंत अनेक ड्रग्ज तस्करांना गजाआड करुन त्यांनी कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा साठा जप्त केला होता. इतकेच नव्हे तर दोन ठिकाणी ड्रग्ज बनविणार्‍या कारखान्यांचाही त्यांनी पर्दाफाश केला आहे. दहावी पेपर लिकप्रकरणात आरोपींना अटक करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. उशिरा का होईना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्याने आनंद झाला अशी प्रतिक्रिया दया नायक यांनी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -