घरमुंबईहजारोंचा माल वाचवताना लाखमोलाचा जीव गमावला

हजारोंचा माल वाचवताना लाखमोलाचा जीव गमावला

Subscribe

पालिकेच्या कारवाईदरम्यान फेरीवाल्याचा मृत्यू

रस्त्याच्या कडेला चप्पल विकण्याचा व्यवसाय करणार्‍या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याकरता अतिक्रमण विभागाचे अधिकारी विजय पार्क भागात येत होते. मात्र आपला माल आणि हातगाडी जप्त करतील या भीतीने गाडी घेऊन पाळणार्‍या फेरीवाल्याचा हृदयविकाराचा झटका आल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 6 फेब्रुवारी रोजी घडली. अतिक्रमण विभागाच्या पथकाच्या या जुजबी कारवाई विरोधात स्थानिक नागरिक आणि विक्रेत्यांमध्ये संताप आहे. फरीद अहमद रा. वडवली गाव पुनर्वसन चाळ, ठाणे असे या फेरिवाल्याचे नाव असून त्याचा मृतदेह पालिकेच्या स्वाधीन करू असा पवित्रा स्थानिकांनी घेतला.

पालिका अतिक्रमण विभागविरोधी पथक कारवाईसाठी आले. रस्त्याच्या कडेला बसलेल्या फेरीवाल्यांच्या गाड्या पकडल्या आणि त्याच ठिकाणी जवळच असलेल्या फरीद अहमद याचीही गाडी पकडण्याचा प्रयत्न केला. फरीदने कशीबशी गाडी सोडवून माल व गाडी घेऊन पळू लागला. आताच कर्ज काढून माल भरला तोही जमा होईल आणि गाडीही तुटेल या भीतीने तो पळत असताना त्याच्या पाठीमागे अतिक्रमण विभागाचे पथकही पळत होते. काही अंतरावर गेलेल्या फरीद याची दमछाक झाली आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला, तो खाली पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. हजारो रुपयांचा माल आणि गाडी वाचविण्यासाठी फरीदचा लाखमोलाचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना विजयपार्क परिसरात घडल्याने फेरीवाले, बघे आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.

- Advertisement -

फेरीच्या धंद्यामुळे पाच मुली आणि तीन मुले आणि पत्नी अशा नऊ जणांचा उदरनिर्वाह फरीदकडून केला जात होता.रस्तारुंदीकरण झाल्यानंतर पालिकेचे कर्मचारी कारवाईसाठी येत असल्याने आधीच टेन्शनमध्ये फेरीवाले होते. त्यातच अगोदरच्या कारवाईत माल जप्त झाल्याने कर्ज घेऊन माल भरला आणि तो वाचविण्यासाठी फरीदने प्राण गमावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -