घरमुंबईबेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यावर टीका

बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यावर टीका

Subscribe

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला १० जागाही मिळणार नाहीत, अशी टीका मुंडेंनी केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पत्र एकमेकांवर टीका करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर त्याचे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे दिले आहे. त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली आहे. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केली होती ही टीका 

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात शरद पवारांवर निशाणा साधला होता. ‘लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा आकडा पार करता आला नाही. ते पण पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत. पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की, संगीत खुर्ची हेच कळत नाही’, अशी खोचक टीका मुख्यमंत्र्यांनी पवारांवर केली होती. त्यांच्या या टीकेला देखील धनंजय मुंडे यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या एकमेकांवर टीकास्त्र सुरु असल्याचे पहायला मिळत आहे.

- Advertisement -

काय म्हणाले धनंजय मुंडे 

मुख्यमंत्र्यांवर टीका करताना धनंजय मुंडे यांनी असे म्हटले आहे की, ‘भाजपाचे कधीकाळी दोन खासदार होते. हे मुख्यमंत्र्यांनी विसरू नये. बेडकाने कितीही फुगले तरी बैल होत नाही. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला १० जागाही मिळणार नाहीत, अशी टीका मुंडेंनी केली आहे. लोकांनी ठरवले महाआघाडीचे नेत्तृत्व शरद पवार करावे, आता याच जनतेने भाजपाचे सरकार घालवायचे ठरवले आहे, असे देखील धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -