घरताज्या घडामोडीसरकारने विमा कवच नाकारल्याने डॉक्टर संतप्त, राज ठाकरेंची घेतली भेट

सरकारने विमा कवच नाकारल्याने डॉक्टर संतप्त, राज ठाकरेंची घेतली भेट

Subscribe

कोरोना संकटात डॉक्टर आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र काम करत आहेत. यादरम्यान अडीच लाखांपेक्षा जास्त डॉक्टरांनी सेवा दिली. मात्र सरकारने त्यांना विमा कवच नाकारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेटी घेत आपली व्यथा मांडली. कोरोनाच्या काळात सरकारने सक्तीने क्लिनिक उघडण्यास डॉक्टरांना भाग पाडले. पण कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा विमा नाकारला जात असल्याने या डॉक्टरांनी संताप व्यक्त केला. आतापर्यंत १४७ डॉक्टरांचा दुर्दैवी मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. मात्र सरकार याबाबतची जबाबदारी घेत नसल्याची व्यथा राज ठाकरेंकडे मांडली आहे.

राज ठाकरे यांच्या भेटी दरम्यान डॉक्टरांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, ‘गेल्या जून महिन्यात ७ तारखेला एका डॉक्टराचा मृत्यू झाला. ते लॉकडाऊन दरम्यान सतत सेवा देत होते. आम्ही जेव्हा अर्ज केला तेव्हा ७ सप्टेंबर पत्र देऊन सांगितले की, तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर होता. त्यामुळे त्याला विमा देताना देणार नाही. तसेच तुम्ही स्वतः खासगी दवाखान्यात काम करत होते आणि याचा कोविडशी काहीही संबंध नसल्याचे अर्जात नमूद केले आहे. हे फार निर्दयी प्रकारचे स्टेटमेंट आहे. त्यामुळे आम्ही यातून मार्ग काढण्यासाठी राज साहेबांकडे आलो आहोत.’

- Advertisement -

यावेळी संदीप देशपांडे म्हणाले की, ‘कोरोना योद्धे म्हणून आपण ज्यांच्यासाठी थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, विमानातून पुष्पवृष्टी केली त्यांना मुळात वागणूक अशा पद्धतीची मिळत असेल तर त्या टाळ्या वाजवण्याला, थाळ्या वाजवण्याला आणि पुष्पवृष्टीकरणाला काही अर्थ उरत नाही. राज्य सरकार सध्या कशात व्यस्त आहे हे आपल्याला माहित आहे. कोरोनाशी लढतोय म्हणायच आणि लोकांना भलत्या गोष्टीत व्यस्त करायच आणि मुळात राज्यात गंभीर विषय आहे त्याकडे लक्ष द्यायच नाही. सरकारची ही दुटप्पी भूमिका आहे आणि सरकार सपशेल अपयशी झालेल आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -