घरमुंबईनोकरदार दाम्पत्यासाठी रेल्वेकडून गुड न्यूज

नोकरदार दाम्पत्यासाठी रेल्वेकडून गुड न्यूज

Subscribe

डिलिव्हरी रेल्वे स्थानकांतून घ्या

समजा तुम्ही ऑनलाईन काही वस्तू मागवली असेल. परंतु, त्या वस्तूची तुमच्या घरी प्रत्यक्ष डिलिव्हरी होताना तुम्ही घरी नसाल तर आता काळजी करायची काही गरज नाही, कारण ती वस्तू तुम्ही आता तुमच्या नजिकच्या रेल्वे स्थानकातून तुम्ही घरी घेऊन जाऊ शकणार आहात. मध्य रेल्वे मार्गांवर ऑनलाईन शॉपिंगचे उभारलेले पीक पॉईट यशस्वी ठरले आहेत.त्यामुळे आता इतरही रेल्वे स्थानकांत ऑनलाईन शॉपिंगचे पिक पॉईट उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे.

अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा नेचर बास्केट सारख्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांमार्फत तुम्हाला एखादी वस्तू मागवायची असेल तर घरांत कोणी नसेल तर आता शेजार्‍यांना मस्का मारायची काही गरज नाही. कारण मध्य आणि पश्चिम रेल्वे महत्वाच्या उपनगरीय लोकल स्थानकांवर बड्या ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांचे कुरीयर कलेक्ट करण्यासाठी पिक पॉईंट उभारण्यात आले आहेत. याची सुरुवात मध्य रेल्वेने सप्टेंबर 2019 मध्ये केली होती. मात्र सुरुवातीला

- Advertisement -

3 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर हा करार केला होता. या करारात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, दादर, ठाणे आणि कल्याण स्थानकांवर पिक पॉईंट उभारण्यात आले होते. यातून मध्य रेल्वेला एकूण 6 लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे.

भारतीय रेल्वेत महसूल वाढवण्यासाठी रेल्वेमंत्र्यांनी न्यू इनोव्हेटिव्ह नॉन फेअर रिव्हेन्यू आयडीयाज स्कीम (एनआयएनएफआरआयएस) आणली आहे. यामार्फत महसूल वाढवण्यासाठी अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक योजना म्हणजे रेल्वे स्थानकावर ऑनलाईन शॉपिंग कंपनीचे पिक पॉईंट उभारणी ही आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात हा प्रकल्प यशस्वी झाला आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -