घरमुंबईखुशखबर! म्हाडाच्या ११९४ घरांची निघणार लॉटरी

खुशखबर! म्हाडाच्या ११९४ घरांची निघणार लॉटरी

Subscribe

दिवाळीत ७ नोव्हेंबरपूर्वी म्हाडाची लॉटरी निघेल, असं यावेळी जाहीर करण्यात आलं आहे. यंदा या लॉटरीत निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात येणार आहेत.

सर्वसामान्य व्यक्तीच्या घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’ नेहमीच प्रयत्नशील असतं. सर्वसामान्यांना मुंबईसारख्या शहरात आपल्या हक्काचं घर मिळावं यासाठी, म्हाडाकडून त्यांना रास्त दरात घरं उपलब्ध करुन दिली जातात. आजच्या तारखेला म्हाडा लाखो लोकांसाठी खूप मोठा आधारं बनलं आहे. दरम्यान म्हाडाने सामान्य मुंबईकरांना एक नवीन खुशखबर दिली आहे. दिवाळीपूर्वी मुंबई म्हाडाच्या १ हजार १९४ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी शुक्रवारी (आज) पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली.  दिवाळीत ७ नोव्हेंबरपूर्वी म्हाडाची लॉटरी निघेल, असं यावेळी जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदा म्हाडाच्या लॉटरीत निम्मी घरं अल्प उत्पन्न गटासाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान मुंबईच्या कोणत्या भागांमध्ये, किती घरांसाठी ही लॉटरी निघणार आहे तसंच त्या-त्या भागातील घरांच्या किंमती काय असणार आहेत, याविषयीची ही सविस्तर महिती :


वाचा : ३ लाख म्हाडावासीयांना, मोठी घरं मिळणार

ठिकाण – अँटॉप हिल, वडाळा
उत्पन्न गट – अत्यल्प उत्पन्न गट
घरं – २७८
किंमत – ३० लाख ७१ हजार
ठिकाण – प्रतिक्षानगर, सायन
उत्पन्न गट – अत्यल्प उत्पन्न गट
घरं – ८३
किंमत – २८ लाख ७० हजार ७००
ठिकाण – प्रतिक्षानगर, सायन (RRकडून प्राप्त)
उत्पन्न गट – अत्यल्प उत्पन्न गट
घरं – ५
किंमत – १६ लाख ४० हजार ४६४
ठिकाण – पी.एम.जी.पी. मानखुर्द
उत्पन्न गट – अत्यल्प उत्पन्न गट
घरं – ११४
किंमत – २७ लाख २६ हजार ७५७
ठिकाण – गव्हाणपाड, मुलुंड
उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट
घरं – २६९
किंमत – ३० लाख ७ हजार २७
ठिकाण – सिद्धार्थनगर, गोरेगाव
उत्पन्न गट – अल्प उत्पन्न गट
घरं – २४
किंमत – ३१ लाख ८५ हजार
ठिकाण – पंतनगर, घाटकोपर
उत्पन्न गट – मध्यम उत्पन्न गट
घरं – २
ठिकाण – टागोरनगर, विक्रोळी
उत्पन्न गट – मध्यम उत्पन्न गट
घरं – ७
ठिकाण – महावीरनगर
उत्पन्न गट – मध्यम उत्पन्न गट
घरं – १७०
किंमत ५८ लाख ६६ हजार ३००
ठिकाण – पंतनगर OB-1, घाटकोपर
उत्पन्न गट – उच्च उत्पन्न गट
घरं – २
ठिकाण – सहकारनगर
उत्पन्न गट – उच्च उत्पन्न गट
घरं – ८
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -