घरमुंबईVideo: 'आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा..' कंगनाने मुख्यमंत्र्यावर...

Video: ‘आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा..’ कंगनाने मुख्यमंत्र्यावर साधला निशाणा

Subscribe

व्हिडिओमध्ये कंगनाने असे म्हटले की, 'उद्धव ठाकरे तुझे क्या लगता है, मेरा घर तोडके मेरे साथ बदला लिया है| आज मेरा घर टुटा है, कल तेरा घमंड तुटेगा...

गेल्या काही दिवसांपासून कंगना आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. आज सकाळी कंगनाच्या पाली हिल येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर BMC ने कारवाई केली. ही कारवाई सुरुवात असताना कंगनाने शिवसेना आणि BMC वर चांगलाच निशाणा साधला. मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यानंतर पुन्हा कंगनाने ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ असा हॅशटॅग देऊन नवं ट्विट केल्याचे समोर आले आहे. मुंबईत दाखल होताच कंगनाने एक व्हिडिओ शेअर केला त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख केल्याचे दिसते आहे. तर पुन्हा कंगनाने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

‘तुमने जो किया अच्छा किया’

- Advertisement -

या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलताना दिसतेय. यावेळी व्हिडिओमध्ये बोलताना तिने, ‘उद्धव ठाकरे तुला काय वाटतं? तू फिल्म माफियांशी हातमिळवणी करून माझं घर तोडून खूप मोठा बदला घेतला आहेस? आज माझं घर तोडलं आहे मात्र उद्या तुझी घमेंड मोडेल. हे वेळेचे चक्र आहे. लक्षात ठेव वेळ कधीच सारखी नसते. मला असं वाट की तू माझ्यावर फार मोठा उपकार केला आहेस. मी आज काश्मिरी पंडितांना काय यातना झाल्या असतील हे समजू शकते. मी देशाला वाचन देते की मी केवळ अयोध्याचं नाही तर काश्मीरवरही एक चितपट बनवेन. आणि माझ्या देशवासियांना जागृत करेन. जे माझ्यासोबत झालं त्याच्यामागे काही अर्थ आहे. जय हिंद! जय महाराष्ट्र!’ अशी भूमिका मांडली आहे.

यासह तिने असं म्हटले की, काश्मिरी पंडितांवर काय परिस्थिती आली असेल मला याचा आज अंदाज आलाच.. तसेच मी आयोध्येवर चित्रपट करेन, काश्मिरवरही करेन, माझ्याबरोबर जे आज झालं ते चांगलंच झालं असं ही कंगना म्हणाली.

- Advertisement -

घरी पोहोचताच तीन शब्दांत ठाकरे सरकारवर निशाणा

मुंबईत दाखल झाल्यानंतर कंगनाने पुन्हा ट्विट करत शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. कंगनाने १२ सेकंदांचा एक व्हिडीओ ट्विट केला. यामध्ये तिच्या पाली हिल येथील कार्यालयात झालेली तोडफोड दिसत आहे. कोसळलेलं छत, मोडलेल्या वस्तू यामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहेत. ‘डेथ ऑफ डेमोक्रसी’ अशा तीन शब्दांत कंगनाने तिच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवर भाष्य केले आहे. मुंबईत दाखल झालेली कंगना सध्या तिच्या खार येथील निवासस्थानी आहे.


कंगनापासून दूर राहा आणि चौकशी थांबवा; गृहमंत्र्यांना हिमाचल प्रदेशमधून धमकीचे ९ फोन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -