घरCORONA UPDATEअजबच! कोरोनाचा पेशंटच हरवला, जबाबदार कोण?

अजबच! कोरोनाचा पेशंटच हरवला, जबाबदार कोण?

Subscribe

मुंबईतल्या केईएम रुग्णालयातली आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून एक ७० वर्षीय कोरोना रुग्ण हरवला आहे. व्हेंटिलेटवर असलेला हा रुग्ण हरविणे गंभीर बाब असून त्याला जबाबदार कोण? असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी केला आहे.

याविषयी सांगताना सोमय्या म्हणाले की, ‘लालबाग, जिजामातानगर येथे राहणारे एक ७० वर्षांचे रुग्ण १४ मे ला रुग्णालयात दाखल झाले. १८ मे २०२० ला अचानक तब्येत खालावल्यामुळे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आणि व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. १९ मे ला सकाळी नातेवाईकांना सांगण्यात आले की आपला पेशंट वॉर्डमधून हरवला आहे. यानंतर २१ मे ला दोन दिवसांनी एक मृतदेह दाखवत तो त्या रुग्णाचा असल्याचे दर्शवले. मात्र तो त्यांचा मृतदेह नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले. आता १० दिवस झाले, आजपर्यंत त्या रुग्णाचा तपास सुरु आहे, ते कुठे आहेत हे कोणालाच माहित नाही’.

- Advertisement -

एकीकडे कोरोनाबाधितांना उपचार कसे मिळणार? याची चिंता असतानाच दुसरीकडे आता रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या सगळ्याला जबाबदार कोण? याचे उत्तर रुग्णालय प्रशासनाला मात्र अद्याप सापडलेले नाही. रुग्ण कसा काय हरवला? व्हेंटिलेटरवर असलेला रुग्ण पळून तर जाऊ शकत नाही. मग याला जबाबदार कोण? असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -