पश्चिम द्रुतगती महामार्गावर कोसळली दरड; वाहतूक ठप्प

पावसामुळे कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे.

landslide western express highway near kandivali no casualties
पश्चिम द्रुतगती महामार्गावर कोसळली दरड; एका बाजूची वाहतूक बंद

मुंबईमध्ये पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली असून सोमवारी रात्रीपासूनच मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे. तर कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. तर वाहतूक फाउंटन येथून वळवण्यात आली आहे.

कांदिवली येथे हायवेवर दरड कोसळत असल्याचे थरारक दृश्य

कांदिवली पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळली, हे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, August 3, 2020

कोणतीही जीवितहानी नाही

मालाड पूर्व टाइम्स बिल्डिंगच्या समोर असणारा डोंगराचा भाग कोसळल्याची घटना घटना घडली. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली असून रस्त्यावर गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. तर कांदिवलीजवळ डोंगराचा भाग कोसळून पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. तर मिरारोडहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे.

सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या या महामार्गावर दरड हटवण्याचे काम सुरु आहे.

पश्चिम द्रुतगती मार्गावर कांदिवली येथे दरड कोसळली, वाहतूक ठप्प

रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावासमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Monday, August 3, 2020

एनडीआरएफच्या तुकड्या सज्ज

मुंबईत सोमवारपासून जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईत वरळी, धारावी, दादर, मुलुंड, विक्रोळी, चेंबूर, गोरेगाव, अंधेरी याठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. तर कुर्ला, नेहरुनगर, भायखळा, गोरेगाव, किंग सर्कल, करी रोड, कांदिवली, चारकोप परिसरातील सखल भागात पाणी साचले आहे.


हेही वाचा – Live Mumbai Rain: मुसळधार पावसाने ठाण्यात एकाचा मृत्यू