घरमुंबईकामाठीपुरात साजरा होतो सर्वधर्मीय माघी गणेशोत्सव!

कामाठीपुरात साजरा होतो सर्वधर्मीय माघी गणेशोत्सव!

Subscribe

राज्यात सर्वत्र माघी गणेशोत्स साजरा होत असताना मुंबईतील कामाठीपुरा परिसरातही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे.

राज्यात सर्वत्र माघी गणेशोत्स साजरा होत असताना मुंबईतील कामाठीपुरा परिसरातही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. अखिल कामाठीपुरा माघी गणेशोत्सव मंडळातर्फे या परिसरात लाडक्या बाप्पाच्या जन्माचा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यंदाचे हे उत्सवाचे ७ वे वर्ष आहे. विशेष म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात. यामध्ये मराठी, गुजराती, तेलगू, मारवाडी, मुस्लिम, भोरी मुसलमान या सर्वच धर्मातील लोकांचा समावेश असतो. हा एकदिवसिय सोहळा असला तरी कामाठीपुरामध्ये दहा दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या दहा दिवसांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये कामाठीपुरा श्री, भजन, ऑर्केस्ट्रा, बॉडीबिल्डर स्पर्धा, नृत्य स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असतो. या निमित्ताने कामाठीपुरातील लोकांचे मनोरंजन होते. तसेच येथील मुलं-मुली विविध स्पर्धा आणि कार्यक्रमात सहभागी होतात. दरवर्षी एकच मूर्ती या मंदिरात ठेवण्यात येत. या बाप्पाची पूजेची मूर्ती सुप्रसिद्ध मुर्तिकार विशाल शिंदे यांनी साकारली आहे.

वाचा – माघी गणेशोत्सवानिमित्त भाविक बाप्पाच्या दर्शनाला

- Advertisement -

वाचा – गणेशोत्सव २०१८: मुंबईतील मानाच्या राजांचे विसर्जन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -