घरमहा @२८८देशातून सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात

देशातून सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात

Subscribe

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार लोकांना सर्पदंश

देशात सर्पदंशाचं प्रमाण वाढलं असून सर्पदंशाच्या घटनेत महाराष्ट्र देशभरात आघाडीवर असल्याचं एका अहवालातून स्पष्ट झालं आहे. २०१८ – १९ मध्ये महाराष्ट्रात ४२ हजार ०२६ लोकांना सर्पदंश झाल्याचं समोर आलं आहे. तर, भारतात २०१७ -१८ या साली २ लाख ४९२ लोकांना सर्पदंश झाला होता. पण, हे प्रमाण २०१८-१९ या साली वाढलं असून २ लाख ३० हजार ९५० एवढ्या लोकांना सर्पदंश झाल्याची माहिती एका अहवालात समोर आली आहे.

‘एलसेव्हियर’ जर्नलमधील माहितीनुसार, 

‘एलसेव्हियर’ जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. सर्पदंशाबाबत देशभरात एक संशोधन करण्यात आलं आहे. आर्थिक संशोधन संस्थेचे प्रदीप एस साळवे, श्रीकांत वतावती आणि ज्योती हल्लाद यांनी हे संशोधन प्रकाशित केलं आहे. त्यात आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणालीचा डेटा वापरुन हे जिल्हास्तरीय विश्लेषण करण्यात आलं आहे.

- Advertisement -

या संशोधकांनी केलेल्या संशोधनात दिलेल्या माहितीनुसार, २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमध्ये ३२. ४ लोकांना सर्पदंश झाला आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे ३६.६, तामिळनाडूमध्ये ३६.६ आणि गोव्यात ३४.५ लोकांना सर्पदंश झाल्याची माहिती आहे. २०१७ -१८ मध्ये महाराष्ट्रात ३८ हजार ९०४ जणांना सर्पदंश झाला. तर, त्या खालोखाल पश्चिम बंगालमध्ये ३४ हजार २३९ लोकांना सर्पदंश झाला.

२०१८-१९ मध्ये महाराष्ट्रात सर्पदंशाचे प्रमाण वाढलेलं दिसून आलं. दर एक लाख लोकसंख्येमध्ये ३५ लोकांना सर्पदंश झाला. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. पण, राज्यांची संख्या पाहता महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये सर्पदंश होण्याचे प्रमाण जास्त आहे.

- Advertisement -

मुंबईच्या परळ विभागात असलेल्या हाफकिन या रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, भारतातील महाराष्ट्र राज्य हे सर्पदंशाच्या आढळलेल्या घटनांमध्ये आणि मृत्यू होण्याच्या कारणांमुळे आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एप्रिल ते डिसेंबर २०१७ मध्ये ३३ हजार ६७३ केसेस आढळल्या आहेत. ज्यातून मृत्यू होण्याचं प्रमाणही जास्त आहे. भारतात दरवर्षी २ ते ३ लाख सर्पदंशांच्या केसेस आढळतात. त्यातून ५० हजार रुग्णांचा मृत्यू होतो. तर, मुंबईत एप्रिल ते ऑक्टोबर २०१७ मध्ये १३३ केसेस आढळल्या आहेत. तर, ठाण्यात १ हजार ३३२ सर्पदंशाच्या केसेस आढळल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतात फक्त १० टक्केच सर्पदंशाच्या घटनांची नोंद केली जाते.

महाराष्ट्रातील सर्पदंशाची आकडेवारी –

२०१४ – २०१५ – ३८ हजार ५१४
२०१५ – २०१६ – ३९ हजार १०३
२०१६ – २०१७ – ३० हजार ६०

तर, एप्रिल ते सप्टेंबर २०१७ मध्ये २६ हजार ८६१ केसेस महाराष्ट्रात आढळल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -