घरमुंबईमराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल टायपिंगचे धडे

मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल टायपिंगचे धडे

Subscribe

विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे शिकवल्या गेलेल्या विषयाचे नेमके किती आकलन झाले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मात्र याबाबत टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग यांच्या आधारे या शंकेवर उत्तर शोधले आहे.

कोरोना संकटकाळात शाळा भरवणे अशक्य असल्यामुळे सर्व शाळांमध्ये सध्या ई-लर्निंग, डिजिटल लर्निंगचा अवलंब केला जात आहे. झूम अ‍ॅप किंवा गुगल मीटच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणे शक्य असले तरी विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे शिकवल्या गेलेल्या विषयाचे नेमके किती आकलन झाले, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलने मात्र याबाबत टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग यांच्या आधारे या शंकेवर उत्तर शोधले आहे.

डी. एस. हायस्कूल ही शाळा आपल्या नवनवीन अभिनव उपक्रमांसाठी तसेच तंत्रस्नेही धोरणांमुळे मुंबईतील एक आदर्श शाळा म्हणून ओळखली जाते. ‘ई-लर्निंगचा अवलंब करताना शिक्षक जे विद्यार्थ्यांना शिकवत आहेत, ते विद्यार्थ्यांना समजत आहे का? त्यांचे आकलन होत आहे का? त्यांना पुन्हा तेच विषय शिकवावे लागतील का, असे अनेक प्रश्न आम्हाला पडले होते. पण टेस्टमॉझ आणि गुगल व्हॉईस टायपिंग या अ‍ॅपच्या सहकार्याने आम्ही त्यावर उत्तर शोधले, असे डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी सांगितले.

- Advertisement -

टेस्टमॉझच्या सहाय्याने शाळेतील शिक्षकांनी लहान-लहान प्रश्नपत्रिका बनवल्या. व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ४० मिनिटे शिकवल्यावर शिक्षक त्यांना वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न सोडवायला देतात. विद्यार्थ्यांचा स्कोअर चांगला आला, तर त्यांना त्या विषयाचे आकलन झाले हे शिक्षकांना समजते, अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे गणित-विज्ञानाचे शिक्षक डॉ. संजय मोहिते यांनी दिली.

मोबाईल किंवा संगणकावर प्रश्नपत्रिका सोडवणे हे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूपच सोपे असले तरी मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागले. पण ‘गुगल व्हॉईस टायपिंग’ हे साधन आमच्या मदतीला धावून आले. या ‘डिक्टेशन टूल’चा वापर करुन विद्यार्थी मराठीत बोलतात आणि गुगल ते टेक्स्टमध्ये रुपांतरीत करते. याशिवाय, विद्यार्थ्यांना ‘गुगल देवनागरी’ आणि ’गुगल इंडिक’ हे अत्यंत सोपे कीबोर्ड शिकवण्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवले आहेत, असेही डॉ. संजय मोहिते यांनी सांगितले.

- Advertisement -

 

इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना ‘गुगल व्हॉईस टायपिंग’ आणि ‘गुगल देवनागरी’ यांच्या माध्यमातून लेखी उत्तरे लिहिता येऊ लागली आहेत. यानिमित्ताने शालेय विद्यार्थी मराठी टायपिंग शिकले, याचाही आम्हाला आनंद आहेच.
– राजेंद्र प्रधान, अध्यक्ष, डी. एस. हायस्कूल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -