घरमुंबईदसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्री मंदावली; सरकारच्या तिजोरीत आर्थिक मंदीचं ग्रहण

दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्री मंदावली; सरकारच्या तिजोरीत आर्थिक मंदीचं ग्रहण

Subscribe

मुंबईत दसर्‍याच्या दिवशी आरटीओ कार्यलायत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणत घट दिसून आली आहे.

वाहन क्षेत्रात आलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम दसर्‍याच्या मुुहुर्तावर बाजारात दिसून आला आहे. मुंबईत दसर्‍याच्या दिवशी आरटीओ कार्यलायत गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाहन खरेदीत मोठ्या प्रमाणत घट दिसून आली आहे. गेल्यावर्षी अंधेरी, वडाळा, ताडदेव आणि बोरिवली या चारही आरटीओतून ६०८ वाहनांची नोंदणी झाली होती. तर यंदा दसर्‍याच्या दिवशी या दोन्ही आरटीओत फक्त २९८ वाहनांची नोंदणी झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी आर्थिक मंदीमुळे ३१० वाहनांची कमी झाली आहेत. त्यामुळे वाहन क्षेत्रातील आर्थिक मंदीची झळ सरकार तिजोरीला बसली असल्याचे दिसून येत आहे.

वाहन खरेदीला मोठा फटका

मुंबई आणि उपनगरातील अंधेरी, ताडदेव, वडाळा आणि बोरिवली या चारही प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर झालेली वाहनांची नोंदणी गतवर्षीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार; वडाळा कार्यालयात गतवर्षी दसर्याच्या मुहूर्तावर १९९ नव्या वाहनांची नोंदणी झाली होती. त्यातून प्रशासनाला ९६ लाख ३६ हजार १८५ रुपयांचा महसूल मिळाला होता. याउलट यावर्षी वडाळा आरटीओमध्ये केवळ ४२ वाहनांची नोंदणी झाली असून त्यातून शासनाला फक्त ९ लाख ७ हजार ४३४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. दरम्यान, ताडदेव आरटीओमधील वाहन नोंदणीत मात्र, काही प्रमाणात वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी ३३ वाहनांची नोंदणी झालेल्या ताडदेव आरटीओमध्ये आज ४१ वाहनांची नोंदणी झाली होती. तर अंधेरी आरटीओत गतवर्षी अंधेरीत ८१ वाहनाची नोंदणी झाली होती. तर यंदा फक्त १८ वाहनाची नोंदणी झाली आहे. त्यामुळे यंदाच्या दसर्‍याच्या मुहूर्तवार वाहन क्षेत्रात आलेल्या आर्थिक मंदीचा मोठा फटका बसला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेआर्थिक मंदीची झळ राज्य सरकारच्या तिजोरीला सुद्धा बसली आहे.

 दसर्‍याच्या दिवशी वाहन नोंदणी

आरटीओ    २०१८        २०१९

अंधेरी      ८१                    १८
वडाळा      १९९                ४२
ताडदेव     ३३                   ४१
बोरिवली   २९५              १९७
—————————–
एकूण =    ६०८             २९८

महसूल सुद्धा घट

२०१८                            २०१९

- Advertisement -

अंधेरी     ७४, ३०, ३१८       १२,३८,४५९
वडाळा    ९६,३६,१८५       ९०,७४,३४
ताडदेव     ३३,३४,१४१       १५,८९,३५३

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -