Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. २१ डिसेंबरला मुंबई महापालिकेच्या कार्यालात असताना हा धमकीचा फोन आला. याबाबत आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान, याआधी मुखअयमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आले होते. या प्रकरणी एकाला अटक देखील करण्यात आली. दरम्यान, आता महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचा फोन आल्याने खळबळ माजली.

किशओरी पेडणेकर यांना २१ डिसेंबरला एका अनोळखी नंबरवरुन किशोरी पेडणेकर यांना फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आपलं नाव न सांगता अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. २१ डिसेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास धमकीचा फोन आला. याबाबतची तक्रार दोन दिवसांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी भारतीय दंड विधानाच्या कलम ५०४, ५०६ (२), ५०७, ५०९ अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरु आहे.

मुंबई जिंकण्यासाठी सर्व पक्षांची जोरदार तयारी

- Advertisement -

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक २०२२ मध्ये होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. राज्यातील महाविकास आघाडीतील पक्ष एकत्र निवडणूक लढवणार नसल्याने भाजपला याचा फायदा होण्याची शक्यता आहे. यामुळे शिवसेनेला पुन्हा मुंबई महापालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर संघर्ष करावा लागणार.

 

- Advertisement -