२७ – मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ

असा आहे मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ

Mumbai
Mumbai North West Loksabha Constituency
मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघ

दिवंगत अभिनेते सुनील दत्त आणि त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या प्रिया दत्त यांच्या रुपाने कित्येक वर्ष हा काँग्रेसचा हक्काचा मतदारसंघ राहिला आहे. १९६७ सालापासून मतदारसंघात झालेल्या एकूण १४ निवडणुकांमध्ये ९ वेळा काँग्रेसचा खासदार इथे निवडून आला आहे. आणि त्यातही ५ वेळा एकटे सुनील दत्त इथून लोकसभेवर गेले आहेत. पण काँग्रेसच्या या एकाधिकारशाहीला २०१४च्या मोदी लाटेमध्ये मोठा धक्का बसला आणि १९९८च्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच इथून गजानन किर्तीकरांच्या रुपाने शिवसेनेचा उमेदवार निवडून आला. जवळपास २ लाख मतांनी काँग्रेसच्या गुरुदास कामतांचा पराभव झाला. प्रामुख्याने मूलभूत नागरी सुवधा (रस्ते, पाणी, वाहतूक) इथल्या निवडणुकांमध्ये कळीचे मुद्दे ठरले आहेत. इथले बहुतांश मतदार हे सेवा क्षेत्रात काम करत असल्यामुळे त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर नागरी सुविधांची मागणी केली जाते. त्याच आधारावर २०१४मध्ये अच्छे दिन आयेंगे म्हणत मतदारांनी किर्तीकरांच्या पारड्यात कौल दिला.

मतदारसंघाचा क्रमांक – २७

नाव – उत्तर-पश्चिम मुंबई

संबंधित जिल्हे – मुंबई उपनगर

प्रमुख उद्योग-व्यवसाय – सेवाक्षेत्रा, लघुउद्योग

प्रमुख शेतीपीक – NA

शिक्षणाचा दर्जा – ९२%

महिला – ८८%

पुरुष ९४%


मतदारसंघ राखीव – खुला प्रवर्ग

एकूण मतदार(२०१४) – ८ लाख ९७ हजार २४५

महिला मतदार – ३ लाख ९३ हजार ०४३

पुरुष मतदार – ५ लाख ४ हजार २०२


लोकसभा निवडणूक – २०१९ चे निकाल 

गजानन किर्तीकर – शिवसेना – ५ लाख ७० हजार ०६३

संजय निरुपम – काँग्रेस – ३ लाख ९ हजार ७३५

सुरेश सुंदर शेट्टी – वंचित बहुजन आघाडी – २३ हजार ४२२

नोटा – १८ हजार २२५


विधानसभा मतदारसंघ – आमदार

१५८ – जोगेश्वरी पूर्व – रवींद्र वायकर – शिवसेना

१५९ – दिंडोशी – सुनील प्रभू – शिवसेना

१६३ – गोरेगाव – विद्या ठाकूर – भाजप

१६४ – वर्सोवा – भारती लव्हेकर – भाजप

१६५ – अंधेरी पश्चिम – अमित साटम – भाजप

१६६ – अंधेरी पूर्व – रमेश लटके – शिवसेना


Shivsena MP Gajanan Kirtikar
शिवसेना खासदार गजानन किर्तीकर

विद्यमान खासदार – गजानन किर्तीकर, शिवसेना

मुंबईतल्या वेगवेगळ्या मतदारसंघातून गजानन किर्तीकर शिवसेनेच्या तिकिटावर आमदार म्हणून ४ वेळा निवडून गेले आहेत. त्यामुळे मुंबई आणि मुंबईकरांची पक्की जाण त्यांना आहे. १९९०साली सर्वप्रथम ते आमदार म्हणून निवडून गेले होते. ९६ सालच्या युती सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री पदाची तसेच माहिती, वाहतूक खात्याची जबाबदारी देखील पार पाडली आहे. त्यामुळे २०१४मध्ये या मतदारसंघात झालेल्या चौरंगी लढतीमध्ये त्यांनी जवळपास २ लाख मतांनी बाजी मारली. त्यांच्यासमोर काँग्रेसकडून गुरुदास कामत, मनसेकडून महेश मांजरेकर आणि आपकडून मयांक गांधी असे तगडे उमेदवार होते. महेश मांजरेकरांनी शिवसेनेच्या वाट्याची ६६ हजार मतं घेतल्यानंतर देखील किर्तीकरांनी भक्कम आघाडी घेऊन विजय संपादन केला.

२०१४मधील आकडेवारी

गजानन किर्तीकरशिवसेना – ४ लाख ६४ हजार ५२२

गुरुदास कामत – काँग्रेस – २ लाख ८१ हजार ७९२

महेश मांजरेकरमनसे – ६६ हजार ०८८

मयांक गांधीआप – ५१ हजार ८३५

नोटा – ११ हजार ००९

मतदानाची टक्केवारी – ५०.५७%

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here