घरमुंबईनायरच्या MRI मशीन दुरुस्तीसाठी १.५० कोटी

नायरच्या MRI मशीन दुरुस्तीसाठी १.५० कोटी

Subscribe

जानेवारी महिन्यात मुंबईच्या नायर रुग्णालयात झालेल्या एमआरआय मशीन दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर बिघाड झालेले संबंधित एमआरआय मशीन बंदच होते. मात्र, आता या मशीनची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी तब्बल १.५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

जानेवारी महिन्यात मुंबईच्या नायर रुग्णालयात झालेल्या एमआरआय मशीन दुर्घटनेत राजेश मारू या व्यक्तीचा बळी गेला होता. या दुर्घटनेनंतर बिघाड झालेले संबंधित एमआरआय मशीन बंदच होते. मात्र, आता या मशीनची दुरुस्ती करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या दुरुस्तीसाठी तब्बल १.५० कोटी रुपये खर्च केले जाणार असून यासंदर्भातील प्रस्ताव येत्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडला जाईल. दरम्यान दुरुस्तीसाठी निश्चित करण्यात आलेल्या इतक्या मोठ्या रकमेच्या खर्चावरून वाद रंगण्याची शक्यता आहे.

‘हे’ मशीन ठरलेलं जीवघेणं

महापालिकेने मे. फिलिप्स इंडिया लिमीटेड या कंपनीकडून हे एमआरआय मशीन करारावर घेतलं होतं. ३ वर्षांच्या हमी कालावधीसह आणि ५ वर्षांच्या परिरक्षण कालावधीसह, २००८ च्या मंजुरीनुसार महापालिकेने ७ कोटी ८९ लाख २८ हजार ८१३ रुपयांना खरेदी केलं होतं. २१ जानेवारी २०१७ रोजी या मशीनचा ८ वर्षांचा कालावधी संपला होता. मात्र, त्यानंतर रुग्णसेवेकरिता या मशीनचा वाढीव एक वर्षाचा परिरक्षण करार फिलिप्स कंपनीसोबत करण्यात आला होता. याननंतर संबधित मशीनचा पुढील १० वर्षांसाठी देखील करार करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच २८ जानेवारी रोजी ही दुर्घटना घडली आणि तेव्हापासून हे मशीन बंद पडली.

- Advertisement -

दुरुस्तीचा खर्च ‘वारेमाप’

नायर इस्पितळातील रुग्णांची होणारी अडचण आणि गरज लक्षात घेता प्रशासनाने आता हे मशीन दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिप्स कंपनीकडूनच हे दुरुस्त करुन घेण्यात येणार आहे. या दुरुस्ती अंतर्गत येणारा एकंदर खर्च –

स्पेअर पार्ट्सचा खर्च – ५६ लाख ६७ हजार ४२४ रुपये

- Advertisement -

सर्विस ऍक्टिवीटी खर्च – २३ लाख ६० हजार रुपये

हेलिअम भरण्याचा खर्च – १३ लाख ७९ हजार १८४ रुपये

वार्षिक परिरक्षणाचा खर्च – ५९ लाख २७ हजार १२८ रुपये

एकूण खर्च – १ कोटी ५३ लाख ३३ हजार ७३६ रुपये


‘काय’ होती नेमकी दुर्घटना?

२८ जानेवारी २०१८ रोजी नायर रुग्णालयातील एका रुग्णाच्या नातेवाईकाचा या एमआरआय मशीनमुळे मृत्यू झाला होता. राजेश मारू असं त्या व्यक्तीचं नाव होतं. राजेश रुग्णासाठी ऑक्सिजन सिलेंडक घेऊन जात असताना सिलेंडरसह एमआरआय मशीनमध्ये ओढला गेल्याने त्यात अडकून त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान एमआरआय मशीनजवळ प्रशिक्षित कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक न ठेवल्याने तसंच आवश्यक दक्षता न घेतल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक व मृत राजेशच्या नातेवाईकांनी केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -