घरमुंबईबनावट कागदपत्रांच्या मदतीने परराज्यात गाड्या विकणारी टोळी गजाआड

बनावट कागदपत्रांच्या मदतीने परराज्यात गाड्या विकणारी टोळी गजाआड

Subscribe

बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँकांकडून गाड्या हप्त्यांवर घेऊन त्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत या टोळीकडून ६४ लाख रुपयांच्या ६ गाड्या जप्त करण्यात आल्या असून, परराज्यात विकलेल्या इतर गाड्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

बनावट कागदपत्रांच्या मदतीने बँकांकडून गाड्या हप्त्यांवर घेऊन त्या गाड्या परराज्यात विकणाऱ्या एका सराईत टोळीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. गॉर्डन मिस्कीटा (३२) आणि गणपती रायकर (४६) अशी आरोपींची नावे आहेत. आतापर्यंत या टोळीकडून ६४ लाख रुपयांच्या ६ गाड्या जप्त करण्यात आल्या असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मालमत्ता कक्षाच्या आवाराला सध्या एका कार शोरुमचे स्वरूप आले आहे. फोक्सव्हॅगन पोलो, हुंडाई क्रेटा, व्हेरना, आय २०, अॅसेंट, मारूती स्विफ्ट अशा महागड्या गाड्यांची जणू रांगच लागली आहे.

असे आले प्रकरण उघडकीस

बनावट कागदपत्रांच्या मदतीने गॉर्डन मिस्कीटा आणि गणपती रायकर हे आरोपी कर्जावर गाड्या घेत होते. त्यातील त्यांनी काही गाड्या विकल्या, तर काही गाड्या गहाण ठेऊन मिळालेले लाखो रुपये उडवले. विशेष म्हणजे बँकेला हा घोटाळा समजण्यापूर्वीच पोलिसांनी या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यानंतर बँकांना जाग आली. गॉर्डनने वेगवेगळ्या बँकांमध्ये खाती उघडली आणि कार घेण्यासाठी कर्ज घेतले. कर्जासाठी लागणारी बँक स्टेटमेंट आणि बनावट आयकर रिटर्न त्याला त्याचा साथीदार रायकर हा पुरवत होता. विशेष म्हणजे बँकांना संशय नको म्हणून हे आरोपी सुरुवातीला २ ते ३ हफ्ते भरून गाडी घेऊन पसार व्हायचे. या दोघांनी मिळून काही गाड्या गुजरातमध्ये विकल्या, तर काही गाड्या गहाण ठेवत लाखो रुपये मिळवले होते. गाड्या देताना मालकाला गाड्यांची बनावट कागदपत्रे देण्यास हे दोघे विसरायचे नाहीत. हा सगळा प्रकार समोर आल्याने पोलिसांनी बँकांना आणि गाडी घेण्याची इच्छा असणाऱ्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांपासून या दोघांनी हा फसवणुकीचा धंदा सुरू केला होता. या दोघांनी परराज्यात विकलेल्या इतर गाड्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

- Advertisement -

वाचा – छत्तीसगडमध्ये ११ कोटी ८५ लाखांची दारू, रोकड जप्त

वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये १० लाख रुपयांचा गुटखा जप्त

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -