घरमुंबईरेलनीलवर येणार क्युआर कोड

रेलनीलवर येणार क्युआर कोड

Subscribe

रेल्वेतून बनावट सीलबंद बाटल्या होणार हद्दपार

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम (आयआरसीटी)ने देशभरातील रेल्वे स्थानके तसेच मेल-एक्स्प्रेसमध्ये काही ठराविक कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्री करण्यास परवानगी दिली आहे. ज्यामध्ये अ‍ॅक्वाफिना, बेली, बिबो, बिस्लेरी, किनले, ऑक्सिरिच या सहा ब्रँडच्या समावेश आहे. त्यांच्यासोबत आयआरसीटीसीच्या रेलनीलच्या पाण्याच्या बाटल्यांची सर्वाधिक विक्री होते, परंतु सध्या या कंपन्यांच्या रिकाम्या बाटल्यांमध्ये नळाचे साधे पाणी भरून त्यांची रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमधून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध घालण्यासाठी आयआरसीटीने रेलनीलच्या बाटल्यांवर क्युआर कोड लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बनावट बाटल्या रेल्वेतून हद्दपार होण्यास मदत होणार आहे.

रेल्वे प्रवाशांंना सर्वाधिक स्वस्त आणि शुध्द पाणी रेलनीलच्या माध्यमातून उपलब्ध केले जाते. त्यामुळे प्रवाशांकडूनही याला मोठी पसंती असते. मात्र काही दिवसांपासून रेलनीलच्या बनावट सीलबंद पाण्याच्या बाटल्या सर्रास रेल्वे स्थानकांवर आणि रेल्वे डब्यात विकल्या जात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, म्हणून रेल्वेने ‘ऑपरेशन थ्रस्ट’ सुरु केले होते. त्याअंतर्गत आयआरसीटीसीने रेलनीलच्या पाण्याच्या बाटल्यांवर क्यूआर कोड लावण्याच्या निर्णय घेतला. त्यांच्या चाचण्या झाल्या. अशा प्रकारे येत्या काही दिवसांत हे क्युआर कोड असलेल्या रेलनीरच्या बाटल्या दिसणार आहे. या अशा गैरप्रकाराच्या विरोधात रेल्वेने याआधी अनेकांवर कारवाई केली, परंतु तरीही पाण्याच्या बनावट सीलबंद बाटल्या सर्रास विकल्या जात आहेत. म्हणून आता आयआरसीटीसीने रेलनीलच्या पाण्याच्या बॉटलवर क्यूआर कोड लावण्याच्या निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

असा असणार क्यूआरकोड?                                                                                                  रेल्वे स्थानकांवर आणि एक्स्प्रेस, मेलसारख्या गाड्यांमध्ये मिळणार्‍या रेलनीलच्या पाण्याच्या बॉटलवर क्यूआरकोडचा स्टीकर असणार आहे. त्या क्यूआरकोडवर तुम्ही तुमच्या पेमेंट अ‍ॅपवरून स्कॅन केल्यास तुम्हाला पाण्याच्या बाटलीची इत्यंभूत माहिती या क्यूआरकोडच्या माध्यमातून तुमच्या मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. इतकेच नव्हे तर रेलनीलच्या पाण्याची बाटली सीलबंद होताना लाईव्ह व्हिडीओ सुध्दा प्रवाशांना पाहता येणार आहे.

ऑपरेशन थ्रस्ट’अंतर्गत कारवाई
•७३२ प्रकरण  दाखल
•८०१ लोकांना अटक
•४ पेन्ट्री कार मॅनेजरला अटक
•४८ हजार ८६० पिण्याच्या पाण्याची बाटल्या जप्त

- Advertisement -

क्यूआरकोडमधून कोणती माहिती मिळणार
-पाण्याच्या बाटल्यांची पॅकींग डेट, पाण्याचे वजन, शुध्दता, रेलनीलच्या संबंधित संपूर्ण माहिती, बाटल्यांचे पॅकींग ठिकाण, स्कॅन केली बाटली दुसर्‍यांदा स्कॅन होणार नाही

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -