घरमुंबईकल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा दावा

कल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा दावा

Subscribe

विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती झाली तरी सुध्दा कल्याण पश्चिम विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे पश्चिमेत कुणाचं कल्याण होणार याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपची युती होईल की नाही याबाबत अजूनही कोणताच निर्णय झालेला नाही. मात्र, शिवसेनेने कल्याण डोंबिवलीतील चारही विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. दरम्यान, युती झाली तरी सुध्दा कल्याण पश्चिम विधानसभेवर शिवसेनेने दावा केला आहे. त्यामुळे पश्चिमेत कुणाचं कल्याण होणार याकडे लक्ष लागले आहे.

कल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा डोळा

कल्याण डोंबिवलीत एकूण चार विधानसभा मतदार संघ आहेत. डोंबिवली कल्याण पश्चिम आणि कल्याण पूर्व या तीन मतदार संघात भाजपचे आमदार आहेत तर कल्याण ग्रामीण हा एकमेव मतदार संघात सेनेचा आमदार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत सेना भाजप स्वतंत्रपणे लढले होते. त्यावेळी अवघ्या २ ते ७ हजाराच्या मतांच्या फरकांनी सेनेला दोन जागा गमवाव्या लागल्या होत्या. युतीबाबत कोणताच निर्णय झालेला नसल्याने भाजपनेही चारही विधानसभा मतदरात संघात मुलाखती घेतल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेनेही शुक्रवारी सेनाभवन येथे चारही मतदार संघात उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी शिवसेना आग्रही असून शिवसेनेतून सर्वाधिक १० जणांनी मुलाखत दिली तसेच कल्याण पूर्वेतही आठ जणांनी इच्छूकांनी मुलाखत दिली. या दोन मतदार संघावर शिवसेनेचा डोळा आहे. मात्र, हे दोन्ही मतदार संघात भाजपचे वर्चस्व असल्याने भाजप हे मतदार संघ सोडणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेची सत्ता असून कल्याणात सेनेचे वर्चस्व आहे. मागील वेळेस मोदी लाटेत भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे मागील वेळेप्रमाणे यंदाही स्वतंत्रपणे लढावेत, अशी शिवसैनिकांची इच्छा आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कल्याण पश्चिमेवर शिवसेनेचा डोळा; भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -