कंगना म्हणाली, फडणवीस मुख्यमंत्री असते तर…

'देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला असता.'

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून आक्रमक झालेली कंगना अद्याप शांत राहायचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्र सरकार बॉलिवूडमधील ड्रग्ज माफियांना पाठिशी घालत असल्याचे मुंबईशी तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी करणारी कंगना दररोज ठाकरे सरकारवर निशाणा साधत आहे. दरम्यान, कंगनाने नवं ट्विट करत त्यात असे म्हटलं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास व्यवस्थित झाला असता.

कंगनानं पुन्हा ठाकरे सरकारला केलं लक्ष्य

या ट्विटमध्ये तिनं शेम ऑन महाराष्ट्र सरकार हॅशटॅग वापरला असून ‘माफियांचे लाड करणारी भ्रष्ट सोनिया सेना सत्तेत नसती, त्याजागी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते, तर मुंबई पोलिसांना त्यांचं काम योग्यपणे करता आलं असतं, असं मी ठामपणे म्हणू शकते. फडणवीस मुख्यमंत्री असते, तर माध्यमांना आणि जनतेला न्याय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला नसता,’, असे म्हणत कंगनाने पुन्हा ठाकरे सरकारला लक्ष्य केल्याचे समोर येत आहे.

यापुर्वी कंगना म्हणाली “चंदीगडमध्ये उतरताच माझी सुरक्षा नाममात्र राहिले आहे. लोक आनंदाने अभिनंदन करत आहेत. असे वाटते, यावेळी मी वाचले. एक दिवस होता, जेव्हा मुंबईत आईच्या कुशीतली उबदारता जानवत होती. आज असा दिवस आहे, जीव वाचला म्हणजे लाखो मिळवले. शिवसेनेची सोनिया सेना होताच मुंबईत दहशतमाजवणाऱ्या प्रशासनाचाच बोल बाला आहे.” असे कंगनाने या केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


‘यावेळी मी वाचले; मुंबईत दहशत माजवणाऱ्या प्रशासनाचाच बोलबाला…’; कंगनाचा पुन्हा सेनेवर निशाणा