अरे खरंच? TBमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण १६ टक्क्यांनी घटलं!!

टीबी हारेगा इंडिया जितेगा!! ही बाब आता प्रत्यक्षात उतरण्यासाठी सुरूवात झाली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

Mumbai
17 thousand TB patients increased in one year in the state
राज्यात एक वर्षात वाढले टीबीचे १७ हजार रुग्ण

टीबी हारेगा इंडिया जितेगा!! महानायक यांची ही जाहिरात सर्वांना माहित असेल. सरकारकडून देखील टीबीच्या समुळ उच्चाटनासाठी सरकारी स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२५ पर्यंत आपला देश टीबी मुक्त असेल असं स्वप्न पाहिलं आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना देखील त्याबाबत सजग राहण्यास सांगितले आहे. परिणामी, आता टीबीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपक्रम राबवले जात आहेत. त्यामुळे, यंदाच्या वर्षी टीबीमुळे मृत्यू झाल्याचं प्रमाण कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खोकला म्हणजे टीबी असा समज आजही लोकांमध्ये आहे. पण, टीबी या आजारात फुप्फुसांचा आजार होऊनही मृत्यू होतात. बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं रुपही बदलले आहे. जे माणसाच्या शरीरावर खूप तीव्रपणे परिणाम करत आहे.

२०१८मध्ये ४ हजार नवीन केसेस

शिवडीतील टीबी हॉस्पिटलकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१८ या वर्षी टीबीमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये घट झाली आहे. यंदा टीबीमुळे १ हजार १९४ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर, ४ हजार ३१४ नवीन केसेस टीबी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. तसंच, २ हजार ९३० रुग्णांवर कठीण आणि किरकोळ अशा टीबीसाठीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मृत्यूच्या घटलेल्या संख्येविषयी शिवडी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितलं की, “गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा टीबीमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण १६ टक्क्यांनी कमी झालं आहे. तसेच नवीन केसेस देखील कमी झाल्या आहेत. यंदा १ हजार १९४ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. गेल्यावर्षी १ हजार ६४९ मृत्यू झाले होते. तर, ४ हजार नवीन केसेस आढळले आहेत.”

फुप्फुस खराब होण्याचं वाढतं प्रमाण 

यंदा टीबीमुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येमध्ये घट झाली आहे. पण, बेजिम नावाचा विषाणू सध्या मुंबईत खूप तीव्रपणे प्रसार करत आहे. जो सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो. त्यामुळे टीबीमुळे फुप्फुसे खराब होऊन मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यासाठी अँटीऑक्सिडंटची खूप मोठी गरज आहे. हा उपचार रुग्णांना सुरू करण्यात आला तर नक्कीच खूप फरक दिसेल, असं ही डॉ. आनंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या ४ वर्षातील मृत्यू 

२०१५मध्ये १,७१२, २०१६मध्ये १,५५१, २०१७मध्ये १,६४९ तर २०१८मध्ये १,१९४ जणांचा टीबीमुळे मृत्यू झाला आहे. 

नवीन आढळलेले रूग्ण

२०१५मध्ये ७, २४३, २०१६मध्ये ६,८३०, २०१७मध्ये ६,४१२ तर, २०१८मध्ये टीबीचे ४, ३१४ रूग्ण नवीन आढळून आले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here