घरमुंबईयंदा ढोल - ताशांचा कडकडाट नाही

यंदा ढोल – ताशांचा कडकडाट नाही

Subscribe

फोर्टच्या राजाचे आगमन साधेपणाने

मुंबईत सध्या गणेशोत्सवाची चाहूल लागली आहे. आपल्या लाडक्या राजाचे स्वागत करण्यासाठी गणेशोत्सव मंडळांची जय्यत तयारी सुरु झाली असून ढोल ताशांसह अनेकांनी पुणेरी ढोलच्या पथकांना पाचारण करण्यासाठी कंबर कसली आहे. परंतु राज्यात अनेक ठिकाणी असलेल्या पूरस्थितीमुळे समन्वय समितीने यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले असून या आवाहनास अनेक मंडळे पुढे सरसावली आहेत. या अनुषंगाने फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या आगमन सोहळा साधेपणाने साजरा करीत आगमन सोहळ्यातील ढोल ताशांच्या निधी हा थेट पूरग्रस्तांना मदत म्हणून देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

येत्या १८ ऑगस्टला ३ वाजता फोर्टच्या राजाचे आगमन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा आगमन मंडळाने शांततेत करायचे ठरवले आहे. फोर्टच्या राजाच्या या स्तुत्य उपक्रम सध्या मुंबईतील इतर मंडळांसाठी आदर्श ठरला आहे. मुंबईतील अनेक मंडळांनी एक हात मदतीची हात ही नवी मोहीम सुरु केली आहे. त्यानंतर आता सार्वजनिक मंडळांनी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यास सुरुवात केली आहे. ज्यात फोर्ट येथील फोर्टचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यंदा आपले आगमन अत्यंत साधेपणाने आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून यावेळी आगमन सोहळ्यातील ढोल ताशा पथके न ठेवता त्यांचा निधी हा पूरग्रस्तांना देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

- Advertisement -

आगमन सोहळ्यात हुल्लडबाजी करणार्‍यांना ही चपराकच असेल. यात ज्या निधीची बचत होईल तो निधी ‘मुख्यमंत्री सहायता निधी’च्या माध्यमातून पूरग्रस्तांना पाठवण्यात येणार आहे.तसेच मुंबईतील इतर मंडळे देखील मदतीसाठी सरसावली असून भायखळ्याच्या सर्व मित्र सामाजिक समूह मंडळाचाही हातभार लागला आहे. सांगलीतील पुरग्रस्तांसाठी भायखळा घोडपदेव येथील डी.पी.वाडी येथील सर्व मित्र सामाजिक समुहाच्यावतीने सांगलीतील कासेगांव ताबवे येथील पुरग्रस्तांना साडी, ब्लँकेट तसेच कपडे आदींची मदत पाठवण्यात आली आहे.

भाद्रपद गणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रातील मोठा गणेशोत्सव आहे. पण याच वेळी महाराष्ट्रावर संकट कोसळले आहे. मग अशावेळी आपण यंदा आपला खर्च कमी करून जास्तीजास्त मदत ही आपल्यापरीने या पूरग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचवायला हवी. यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. आम्ही सर्व गणेश मंडळांना आवाहन करतो तुम्ही देखील तुमच्या पद्धतीने मदत करावी. -नयन डुंबरे, सचिव, फोर्टचा राजा

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -