घरमुंबईराष्ट्रवादीचा दावा : विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात कर्मचारी राहतात

राष्ट्रवादीचा दावा : विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात कर्मचारी राहतात

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वस्तीगृहामध्ये सध्या विद्यार्थी राहत नाही तर बांधकाम विभागाचे कर्मचारी राहत असल्याची धक्कादायक माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली आहे. अॅड. अमोल मातेले यांनी स्वतः या वस्तीगृहाची पाहणी केली असल्याचे म्हटले आहे.

परिक्षेचा सावळागोंधळ असू दे किंवा उत्तरपत्रिकांच्या नूतनीकरणाचा विषय असू दे, दरवेळी आपल्या भोंगळ कारभारावरून चर्चेत राहणार्‍या मुंबई विद्यापीठासंबंधी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. यावेळी मुंबई विद्यापीठाच्या बांधकाम विभागाच्या अकार्यक्षमतेसंबंधी महत्वाची बाब उघड झाली आहे. मुंबई विद्यापीठाच्या कर्मवीर भाऊराव पाटील वस्तीगृहामध्ये सध्या विद्यार्थी राहत नाही तर बांधकाम विभागाचे कर्मचारी राहत असल्याची माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली आहे. अॅड. अमोल मातेले यांनी स्वतः या वस्तीगृहाची पाहणी केली असल्याचे म्हटले आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस परिसरातील रानडे भवन इमारतीच्या छताचा भाग विद्यार्थीनीच्या डोक्यावर पडल्याची घटना ताजी असतानाच विद्यापीठाच्या बांधकाम विभागासंबंधी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाचे कर्मवीर भाऊराव पाटील मुलांचे वसतीगृह गेल्या वर्षभरापासून बंद आहे. इमारतीच्या नूतनीकरणासाठी हे वस्तीगृह बंद ठेवण्यात आलेले आहे. परंतु, अजूनही या वसतीगृहांच्या नूतनीकरणाचे काम दहा टक्के देखील झालेले नाही. मुंबई विद्यापीठात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येतात. त्यांच्या वास्तव्यासाठी या वस्तीगृहांची निर्मिती करण्यात आली होती. परंतु, या वस्तीगृहांमध्ये विद्यार्थी नाही तर मुंबई विद्यापीठाच्या बांधकाम विभागाचे कर्मचारी वास्तव्यास असल्याची धक्कादायक माहिती मुंबई राष्ट्रवादी विद्यार्थी काॅग्रेसचे अध्यक्ष अॅड. अमोल मातेले यांनी दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई विद्यापीठात स्लॅब कोसळून दोन विद्यार्थिंनी जखमी

काय म्हणाले मातेले?

यासंबंधी बोलताना अॅड. अमोल मातेले म्हणाले की, या वस्तीगृहाची पाहणी आम्ही स्वतः केली. याठिकाणी एक ते दोन वर्षांपासून बांधकाम सूरू आहे. हे काम ठराविक वेळेत पूर्ण करणे आवश्यक होते. ते न करता त्या ठिकाणी उपग्रहातील कर्मचारी राहतात. या वसतिगृहात ग्रामीण भागातून शिक्षण घेण्यासाठी येणारे गोरगरिब विद्यार्थी राहायचे. त्यांची सोय व्हावी म्हणून वसतिगृह उभारले गेले. परंतु, मागील दोन वर्षापासून विद्यार्थी खाजगी जागेत आणि इतर ठिकाणी राहत असल्याचे मातेले म्हणाले आहेत.

- Advertisement -


हेही वाचा – मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीवर ७ लाखांचा खर्च

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -