घरमुंबईउपनगरातील मॅनहोल्सवर बसवणार लोखंडी जाळ्या

उपनगरातील मॅनहोल्सवर बसवणार लोखंडी जाळ्या

Subscribe

डॉ. दिपक अमरापुरकर यांच्या मॅनहोल्समध्ये पडून झालेल्या मृत्यूनंतर मुंबईतील पर्जन्य वाहिन्यांच्या सर्वच मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातील मॅनहोल्सपैकी १, ४२५ मॅनहोल्सवर लोखंडी संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्यानंतर पूर्व व पश्चिम उपनगरातील मॅनहोल्सवरही जाळ्या लावण्यात येणार आहेत. काही सखल भागात पाणी तुंबणार्‍या भागांमधीलच मॅनहोल्समध्ये प्राथमिक स्तरावर जाळ्या बसवण्यात येत असल्याने मॅनहोल्सची सुरक्षितता अधांतरीतच आहे.

एल्फिन्स्टन रोडवर पावसाळ्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे डॉ. दिपक अमरापूरकर यांचा पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या वाहिनीच्या मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याची मागणी सपाचे गटनेते रईस शेख यांनी केली. त्यानुसार महापालिका प्रशासनाने पावसाचे पाणी वाहून नेणार्‍या वाहिन्यांच्या मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यात मॅनहोल्समध्ये जाळ्या बसवण्यात आल्या. शहरामध्ये ब्रिटीशकालिन भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर एकूण 24 हजार 647 मॅनहोल्स आहेत. त्यातील आतापर्यंत 1,425 मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

शहरातील मॅनहोल्समध्ये दहा टक्केही जाळ्या बसवण्याची कार्यवाही पूर्ण झालेले नसताना आता पूर्व व पश्चिम उपनगरातील मॅनहोल्सवर जाळ्या बसवण्याचेही काम हाती घेण्यात येत आहे. पूर्व उपनगरातील 91 हजार 998 मॅनहोल्सपैकी 168 वर्तुळाकार आणि 254 आयताकृती जाळ्या बसवण्यात येणार आहेत. तर पश्चिम उपनगरातील 2 लाख 43 हजार 180 मॅनहोल्सपैकी 281 वर्तुळाकार आणि 254 आयताकृती जाळ्या बसवण्यात येणार आहेत

शहर भाग
एकूण मॅनहोल्स : 24,647
बसवण्यात आलेल्या जाळ्या :1,425

- Advertisement -

पूर्व उपनगरे :
एकूण मॅनहोल्स :91,998
बसवण्यात येणार्‍या जाळ्या : ४२२

पश्चिम उपनगरे :
एकूण मॅनहोल्स :24,3180
बसवण्यात येणार्‍या जाळ्या : ५५७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -