घरमुंबईमास्टरलिस्ट घोटाळ्याच्या अहवालातही गडबड; फौजदारी कारवाईची शक्यता

मास्टरलिस्ट घोटाळ्याच्या अहवालातही गडबड; फौजदारी कारवाईची शक्यता

Subscribe

म्हाडाच्या इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना विकास मंडळाच्या (रिपेअर बोर्ड) सह मुख्य अधिकार्‍यांनी उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या नस्तीत घोटाळा करून अवैधरित्या मंजूर केलेल्या निवासी गाळ्यांचे प्रकरण सध्या गाजत आहे. यामध्ये सह मुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी एजंटांशी हात मिळवणी करत काही कोटींचा घोटाळा केला आहे. उपाध्यक्ष म्हैसकर यांनी याबाबत मुख्याधिकारी सतिश लोखंडे यांना चौकशीसाठी नियुक्त केले आहे.मात्र लोखंडे यांनी याप्रकरणी ज्यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्या मिळकत व्यवस्थापक आणि लिपिकांनी यातील महत्त्वाची माहितीच दडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जुन्या उपकर प्राप्त इमारतीतील रहिवाशांना मास्टरलिस्ट नुसार घरे देण्यासाठी 95 जणांच्या यादीला उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांनी मंजुरी दिली होती.प्रत्यक्षात सह मुख्य अधिकारी अविनाश गोटे यांनी एजंटांशी हात मिळवणी करुन त्यात शेवटच्या क्षणाला काही नावे मुख्य अधिकारी सतिश लोखंडे प्रशिक्षणासाठी विदेशात असल्याचा फायदा उचलत अवैधरित्या घुसवली. यात दोन एजंटांचे उखळ पांढरे करुन काही कोटी रुपयांचा घोटाळा केला असल्याची माहिती समोर आली आहे. ही गोष्ट मुख्य अधिकारी आणि उपाध्यक्ष यांच्या लक्षात येताच अवैधपणे देकारपत्रे मिळालेल्या भाडेकरुंची पत्रे रद्द करुन गोटेंना सक्तीच्या पदावर पाठवण्यात आले.

- Advertisement -

यासाठी अविनाश गोटे यांना मिळकत व्यवस्थापक आणि लिपिक यांनी जावक पुस्तकात संशयास्पद नोंदी करून मदत केल्याचे स्पष्ट दिसत आहे.याबाबतचे कागदोपत्री पुरावे महानगरला प्राप्त झालेत. पारदर्शी आणि धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी परिचित असलेल्या सतिश लोखंडे यांना याबाबत अधिक चौकशीसाठी नेमण्यात आले आहे. मात्र, त्यांनी याबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले आहे. त्यांनी पुन्हा हेतूपुरस्सर महत्वाची माहिती लपविली आहे. देकार रद्द करण्यात आलेल्या दोन भाडेकरुंना मिळकत व्यवस्थापक श्रध्दा कुटप्पन आणि लिपिक कविता गुरव यांनी घराचा ताबा लगबगीने दिला आहे.ही गोष्टही अहवाल बनवताना मुख्याधिकार्‍यांपासून लपविण्यात आली आहे.याच घोटाळ्यासाठी कुटप्पन यांनी राजकीय वजन वापरून नियमबाह्य बदली मिळवली आहे. यात गोटेंची उचलबांगडी निश्चित झाली असली तरी गोटेंनी लोखंडेंवर दबाव आणण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

याआधी प्रकाश मेहता गृहनिर्माण मंत्री असताना उपाध्यक्षांनी केलेली बदली गोटे यांनी 24 तासात मंत्रालयातून फिरवून आणली होती. आता म्हैसकर-लोखंडे आणि चेअरमन विनोद घोसाळकर यांनी कडक भूमिका घेतली असल्याने गोटेंच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबत मुख्य अधिकारी सतिश लोखंडे यांना विचारले असता, अहवाल बनवण्याचे काम सुरू आहे. जे घडले ते उपाध्यक्षांच्या आदेशात बदल केल्याने झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.यामुळे मंडळाच्या विश्वासनियतेवर प्रश्न उठू शकतात. ते उठू नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

गृहनिर्माण विभागात याचे तीव्र पडसाद उमटले असून यातील घोटाळेबाज दोषी अधिकार्‍यांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -