17 हजार 345 रुपयांच्या एसटी पासेसची चोरी

एसटी महामंडळात उडाली खळबळ

Mumbai
ST bus station

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा नाशिक विभागाच्या मालेगाव एसटी बस स्थानकावरून 17 हजार 345 रुपयांचे आरक्षण तिकीट पासेस चोरीला गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली असून या पासेस चोरणार्‍या व्यक्तीचा शोध एसटी महामंडळ आणि मालेगांव पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेमुळे संशयाची सुई आता एसटी कर्मचार्‍यांकडे वळत आहे. नाशिकच्या मालेगाव बस स्थानकावरील आरक्षण तिकीट पासेस केंद्रावर २८ नोव्हेबर २०१८ च्या मध्य रात्री पास केंद्राचे कुलूप तोडून काही चोरट्यांनी पासेसची चोरी करून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच तत्काळ याची माहिती मालेगांवच्या पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. तेव्हा पोलिसांनी याबद्दल तक्रार नोंदवून आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. चोरीला गेलेल्या पासेसची संख्या एकूण ३९२ इतकी आहेत. याची किंमत १७ हजार ३४५ रुपये आहे.

पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र अद्यापही या चोरट्यांच्या शोध लागलेला नाहीत. मात्र या घटनेमुळे संपूर्ण एसटी महामंडळाला चांगलाच हादरा बसला आहे. या घटनेनंतर चोरीला गेलेले पासेस एसटी महामंडळाकडून रद्द करण्यात आले आहेत. सोबतच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभाग नियंत्रक यांच्या कार्यालयाकडून मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी यांना पत्र पाठवून सांगण्यात आले आहे की, एसटी बस तपासणीमध्ये पासेसचा गैरवापर होत असल्याचे आढळून आल्यास किंवा पासेस कुठेही कोणत्याही परिस्थिती आढळल्यास तपासणी पथकांनी तसा सविस्तर अहवाल या कार्यालयास पाठवावा, असे सांगण्यात आले आहे.

राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण बसडेपो आणि आगारात सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची योजना आखली होती. मात्र आज राज्यभरातील कित्येक एसटी महामंडळाच्या बस डेपो आणि एसटी आगारात सीसीटीव्हीसुद्धा लागलेली नाही. त्यामुळे बस डेपो आणि एसटी आगाराच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहेत.एसटीचे 392 पासेस लंपास अज्ञात चोरट्यांनी बस स्थानकातील आरक्षण कक्षातून एसटीचे पासेस, काही आरक्षण तिकिटे चोरून नेली आहेत. चोरीला गेलेली पासेसची संख्या एकूण ३९२ इतकी असून यांची किंमत १७ हजार ३४५ रुपये आहे. या पासेसमध्ये, मासिक पास १५, त्रैमासिक पास ४८, आवडेल तेथे प्रवास साधी बस १६, ओळखपत्र १४६, आरक्षण तिकीट साधी बस २५, मोफत विद्यार्थी पास ६० आणि ऍडव्हांस बुकिंग पुस्तकातील तिकिटाच्या समावेश आहेत. या पासेस चोरीमुळे मोठ्या प्रमाणात नाशिक एसटी महामंडळाला चांगलाच हादरा बसला आहेत.

चोरीला गेलेल्या पासेसचा तपशील

मासिक पास =१५
त्रैमासिक पास =४८
४ दिवस आवडेल तेथे प्रवास, साधी बस=०४
४ दिवस आवडेल तेथे प्रवास, निमआराम बस =०५
७ दिवस आवडेल तेथे प्रवास = ०७
ओळखपत्र =१४६
आरक्षण तिकीट, निमआराम बस=२५
आरक्षण तिकीट, साधी बस =७७
मोफत विद्यार्थी पास =६०
————————————
एकूण ३९२ पासेसची चोरी
किंमत 17 हजार 345 रुपये
————————————————-
मालेगावच्या एसटी बसस्थानकाच्या आरक्षण केंद्रावर २८ नोव्हेंबरच्या रात्रीच्या वेळेस पासेस चोरी गेल्याची माहिती मिळते. आम्ही तात्काळ यांची माहिती मालेगाव पोलिसांना दिली आहे. पोलीस या प्रकाराची चौकशी करत आहेत. त्यामुळे यावर जास्त बोलणे योग्य नाही.
– अरुण सिया, विभागीय वाहतूक अधिकारी, नाशिक

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here