घरमुंबईशिवसेना-भाजप पुन्हा युती होणार? उद्धव ठाकरेंच्या 'त्या' विधानामुळे चर्चांना उधाण

शिवसेना-भाजप पुन्हा युती होणार? उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधानामुळे चर्चांना उधाण

Subscribe

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन व्हायला एक आठवडा होत असताना सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला. ठाकरे यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांतील प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन व्हायला एक आठवडा होत असताना सध्या राजकीय वर्तुळात शिवसेना आणि भाजप युतीबाबत पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपही झालेले नसताना अशाप्रकारच्या चर्चा ऐकून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.


हेही वाचा – भाजपमध्ये जितकी मोठी भरती तितकीच मोठी ओहटी – बाळासाहेब थोरात

- Advertisement -

काय आहे प्रकरण?

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध पक्षांतील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमाला गेले होते. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे परत जात असताना त्यांची भेट भाजपचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्यासोबत झाली. यावेळी त्यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये उद्धव ठाकरे यांनी ‘मंगलजी मैं जैसे था, वैसे ही हूं और आगेभी वैसेही रहुंगा’, असे विधान केले. या विधानाची प्रचंड चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. ठाकरे यांच्या या विधानानंतर भविष्यात राज्यातील राजकीय समीकरण काही वेगळे असू शकतात किंवा शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात, अशा चर्चांना उधाण आले. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता ते इतक्या सहजासहजी शक्य नाही, अशीही प्रतिक्रिया काही लोकांकडून मिळत आहे.


हेही वाचा – ‘या तर चोराच्या उलट्या बोंबा’; आशिष शेलारांचा महाविकास आघाडीवर घणाघात

- Advertisement -

…म्हणून शिवसेना-भाजप युती तुटली

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद टोकाला गेले. शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, भाजपने संपूर्ण पाच वर्ष मुख्यमंत्री भाजपचाच राहील, अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढत जाऊन त्यांची अखेर २५ ते ३० वर्षांची राजकीय युती तुटली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -