घरमुंबईअजब हे सरकार! विष्णुप्रसाद नंदराय देसाई यांचा तब्बल ३०० वर्षांचा कार्यकाळ!

अजब हे सरकार! विष्णुप्रसाद नंदराय देसाई यांचा तब्बल ३०० वर्षांचा कार्यकाळ!

Subscribe

विधानभवनाच्या आवारात मंडप उभारण्यात आला असून यातील एका फलकावर चक्क उपसभापती यांचा कार्यकाळच चुकल्याचे दिसत आहे.

साधारणत: विधान परिषद सभापती किंव्हा उपसभापती कार्यकाळ हा सहा वर्षाचा असतो. मात्र तुम्हाला माहित आहे का? महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ३०० वर्षांहून अधिक वर्ष एकच व्यक्ती उपसभापती पदावर होती? हे जर तुम्हाला कुणी सांगत असेल तर? तुम्ही म्हणाल काय तरी काय राव? एखादी व्यक्ती एवढी वर्ष कसे काय उपसभापती असू शकते असा प्रश्न तुम्हाला पडल्या वाचून राहणार नाही? पण हे आम्ही नाही सांगत तर चक्क शासनच सांगतंय… विधान भवनात तसा फलक लावला आहे. सध्या पावसाळी अधिवेशन सुरू असून विधानभवनाच्या आवारात मंडप उभारण्यात आला असून, या मंडपात महाराष्ट्र्र विधानसभा असो वा परिषद याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र यातील एका फलकावर चक्क उपसभापती यांचा कार्यकाळच चुकल्याचे दिसत आहे.

कार्यकाळ दाखवला ३०० हून अधिक वर्षाचा 

महाराष्ट्र विधानसभा १९६० आणि महाराष्ट्र विधान परिषद १९६० पासून आतापर्यंत झालेले अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि उपसभापती यांचा कार्यकाळ देण्यात आला आहे. मात्र या नावांमध्ये विष्णुप्रसाद नंदराय देसाई यांचा कार्यकाळ १६६२ ते १९६८ म्हणजे जवळपास ३०० हून अधिक वर्षाचा कालावधी दाखवण्यात आला आहे आणि ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे रोज याच मंडपातून सर्व आमदार, मंत्री आणि विशेषतः मुख्यमंत्री देखील जात असतात. मात्र कुणाचेही लक्ष या चुकलेल्या फलकाकडे गेले नाही हे विशेष.

- Advertisement -

विरोधक म्हणतात हा तर सरकारचा गलथानपणा

दरम्यान, या बद्दल काँग्रेस आमदार भाई जगताप यांना विचारले असता त्यांनी हा तर सरकारचा गलथानपणा असल्याचे म्हणत जोरदार टीका केली आहे. सगळं भव्यदिव्य करण्याच्या मागे या सरकारचा खोटारडेपणा आणि मार्केटिंगपणा याचा हा प्रकार आहे. काहीतरी भव्यदिव्य टाकायचे आणि आम्ही काही तरी करून दाखवतो हे सांगताना त्यामध्ये काय वस्तुस्थिती आहे, हे बघायला हवे होते, असे त्यांनी सांगितले.

हे प्रकरण गंभीर असून, उपसभापतींची कारकिर्द दाखवताना त्यांच्या बाबतीत अशा पद्धतीने केलेला गलथानपणा शोभत नाही. सभापती असो वा उपसभापती त्यांना असे एक वेगळं स्थान असल्याचे भाई जगतात म्हणाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा –

आव्हाडांनी सत्ताधारी पक्षांवर केली टीका

मतदान करताना मुंबईकरांनी आजचा दिवस लक्षात ठेवावा! – सचिन सावंत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -