घरमुंबईनालासोपाऱ्यात पादचारी पुलावर महिलेची प्रसूती!

नालासोपाऱ्यात पादचारी पुलावर महिलेची प्रसूती!

Subscribe

नालासोपारा रेल्वे स्थानकातील पुलावर एका २६ वर्षीय महिलेची यशस्वी प्रसूती करण्यात आली आहे. या महिलेला नालासोपारा रेल्वे स्थानकाजवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळी ९ची वेळ…नालासोपारा स्टेशन अधिक्षक आर. के. मीना यांना समजलं की रेल्वे स्थानकाच्या मिडल ब्रिजवर एका महिलेला अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या आहेत. अचानक मिळालेल्या माहितीनंतर कोणतीही गडबड न करता त्यांनी त्वरीत पावलं उचलली. रेल्वे स्थानकाजवळ उभ्या असलेल्या १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि दोन नर्सना घेऊन ते तातडीनं स्पॉटवर पोहोचले…डॉक्टरांनी लागलीच प्रसववेदना सोसणाऱ्या महिलेवर उपचार सुरू केले आणि तिची यशस्वीरीत्या प्रसूती केली.

Nalasopara Delivery Case
पादचारी पुलावरच प्रसूती

…आणि ‘ते’ देवासारख्या धावून आल्या!

एखाद्या कथेमध्ये किंवा सिनेमात शोभावी अशीच ही घटना. रविवारी सकाळी ९च्या सुमारास २६ वर्षीय रेश्मा बेगम यांना अचानक प्रसूती वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी त्या नालासोपारा रेल्वे स्टेशनच्या मधल्या पादचारी पुलावर होत्या. आसपासच्या लोकांना काय करावं हेच कळेना! त्यात ऐन गर्दीची वेळ असल्यामुळे पादचारी पुलावर मोठी गडबड होती. पण त्यातही काही प्रवाशांनी प्रसंगावधान राखून रेल्वे स्टेशन सुपरिटेंडेंट आर. के. मीना यांच्यापर्यंत हा सगळा प्रकार पोहोचवला. आणि आर. के. मीना सदर महिलेसाठी देवासारखे धावून आले.

- Advertisement -

तुम्ही हे वाचलंत का? – चालू लोकलमध्येच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या!


निर्णय धाडसी, पण हिंमतीनं पुरा केला!

१०८ रूग्णावाहिकेतील एक डॉक्टर आणि दोन नर्स, याशिवाय काही स्थानिक यांच्या मदतीने पादचारी पुलावरच रेश्मा बेगम यांची प्रसूती करण्याचा निर्णय घेण्यात आला. निर्णय धाडसाचा होता, पण पर्याय नव्हता. डॉक्टरांनी मोठ्या हिंमतीनं ही प्रसूती यशस्वी करून दाखवली. प्रसूती झाल्यानंतर लगेचच रेश्मा बेगम यांना १०८च्याच रुग्णवाहिकेतून नालासोपाऱ्यातल्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे त्यांच्यावर त्वरित उपचार सुरू करण्यात आले.

- Advertisement -

अविस्मरणीय अनुभव!

सध्या बाळ आणि आई हे दोघेही सरकारी रुग्णालयात उपचार घेत असून ते सुखरूप असल्याची माहिती वसई रेल्वे पोलिसांनी दिली आहे. रेश्मा बेगम यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. या घटनेचे साक्षीदार ठरलेल्या प्रत्येकासाठीच ही घटना अविस्मरणीय अशी राहील, हे नक्की!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -