घरमुंबईतुर्भे येथील पालिकेच्या शाळेत चिक्कीत सापडल्या अळया

तुर्भे येथील पालिकेच्या शाळेत चिक्कीत सापडल्या अळया

Subscribe

शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने संपूर्ण शाळेत खळबळ माजली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे गावातील येथील शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चिक्कीत चक्क अळ्या सापडल्या आहेत. या प्रकाराने संपूर्ण शाळेत खळबळ माजली असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर चिक्कीचा दर्जा काटेकोरपणे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे. तुर्भे गाव शाळा क्रमांक २० मध्ये शाळेत नेहमी वाटली जाणारी चिक्की वाटली जात होती. मात्र या चिक्कीत अळ्या आढळल्याचे निष्पन्न झाले. लागलीच ही चिक्की विद्यार्थ्यांकडून परत घेण्यात आली. मात्र या निमित्ताने चिक्कीच्या गुणवत्ततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहे.

वारंवार घडतात अशा घटना

चिक्की द्यायला सुरुवात झाल्यापासून महानगरपालिकेतील ही पहिलच घटना असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पालिका या चिक्की पुरवठादाराला काय दंड ठोठावते हे पाहावे लागणार आहे. शासनाच्या नियमानुसार कंत्राटदार, शाळेत चिक्की वाटप करणारे कंत्राटदाराचे कर्मचारी, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी मुलांना खिचडी किंवा चिक्कीसारखे खाऊ देताना स्वतः खाऊन पाहणे आवश्यक आहे. पालिकेत शिक्षक स्वतः ही चिक्की खाऊन बघतात. पालिका शाळांतील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना दिल्या जाणाऱ्या चिक्कीचा दर्जा व चव योग्य नसल्याच्या तक्रारी शिक्षकांकडे केल्याचे आढळून आले आहे. मात्र त्याबाबत पालिका प्रशासनाला जाग आल्याचे दिसत नाही. त्यामुळे कंत्राटदाराकडून दिली जाणारी चिक्की ही दर्जाहीन असल्याचे सिद्ध झाले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -