घरमुंबईयंदाचा ख्रिसमस सण महागला

यंदाचा ख्रिसमस सण महागला

Subscribe

नाताळ हा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या सणासाठी मोठ्या प्रमाणात खरेदी सुरु असून यंदाचा नाताळ सण महागणार असल्याचे दिसून येत आहे. ख्रिसमस ट्री',जिंगल बेल आणि सांताक्लॉजचे छायाचित्र यांच्या किमतीत वाढ झाली आहे.

अवघ्या चार दिवसांवर नाताळा हा सण आला आहे. देशभरात नाताळ सणाचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा होत आहे. तर ख्रिस्ती बांधवांच्या कुटुंबात उत्साहाला उधाण आलं आहे. बऱ्याच कार्यालयांमध्ये ख्रिसमस साणाची धूम सुरु झाली असून या सणात खेळला जाणारा सण म्हणजे सिक्रेट सांता खेळला देखील जात आहे. या सणात आकर्षक रोषणाई तसेच काही ठिकाणी ख्रिसमस ट्री उभारण्यात येतात. मात्र यांच्या किंमतीत वाढ झाल्याचे समोर आले आहे. ख्रिसमस ट्री आणि जिंगल बेलच्या किंमतीत वाढ झाल्याने यंदाचा नाताळ अनेकांना महाग जाण्याची शक्यता आहे.

या वस्तूंच्या किंमती वाढल्या

नाताळासाठी आवश्यक असणाऱ्या ‘ख्रिसमस ट्री’, जिंगल बेल, कार्ड पेपर आदी वस्तूंचे दर वाढले आहेत. जीएसटी आणि थर्माकोल बंदीमुळे या वस्तू महागल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. साडेतीन ते चार फुटी ‘ख्रिसमस ट्री’ च्या किमती जवळपास १०० ते १२५ रुपयांनी वाढल्या आहेत. या ‘ख्रिसमस ट्री’ने यंदा थेट ५०० रुपयांची उंची गाठली आहे. गेल्या वर्षी याच ख्रिसमस ट्रींना ३५० ते ४०० रुपयांचा दर होता. मात्र यंदा बाजारात याच ‘ख्रिसमस ट्री’ ५०० रुपये मोजावे लागत आहेत. १०० ते १५० रुपयांनी ख्रिसमस ट्रीच्या किमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे थर्माकोलही बाजारात मिळणे बंद झाल्याने अनेकांची गैरसोय होत आहे.

- Advertisement -

यंदा सांताक्लॉजचे छायाचित्र कार्डपेपरमध्ये

दरवर्षी थर्माकोलवर बनवण्यात येणारे सांताक्लॉजचे छायाचित्र यंदा कार्डपेपरमध्ये तयार करण्यात आले आहे. यंदा बाजारात थर्माकोल मिळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदा सांताक्लॉजचे छायाचित्र कार्डपेपरमध्ये उपलब्ध आहेत. यांच्या किंमतीतही वाढ झाली आहे. सांताक्लॉजचे छायाचित्रात ५० ते ६० रुपयांनी महागले आहे. तर जिंगबेल यांच्या देखील किंमतीत वाढ झाली आहे. लहान आकाराची बेल ४० रुपयांना, तर मोठ्या आकाराची बेल २०० किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांना विक्रिसाठी ठेवण्यात आले आहे.

यामुळे किंमती वाढल्या

केंद्र सरकारच्या वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) धोरणामुळे, तसेच थर्माकोल बंदीमुळे यंदाचा नाताळ महागला आहे. यंदा नाताळ सणार वापरण्यात येणाऱ्या सर्वच वस्तूंवर दर वाढले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -