भाजपच्या नगरसेवकांचं महापौरांच्या कार्यालयासमोर आंदोलन

एस अँड टी प्रभाग समितीच्या निकालावरून भाजपच्या नगरसेवकांनी आज महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यालयासोर आंदोलन केलं. शुक्रवारी ‘एस व टी’ प्रभाग समिती अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचे एक मत अवैध ठरले आणि चिठ्ठीवर लागणारा निकाल सेनेच्या बाजूने लागला. पिठासीन अधिकारी महापौर यांनी भाजपच्या नगरसेविका रजनी केणी यांचे मत अवैध ठरवण्यावर भाजपने आक्षेप घेत आज महापौरांच्या कार्यालयासमोर भाजपच्या नगरसेवकांनी आंदोलन केलं. (फोटो सौजन्य - दीपक साळवी)