घरIPL 2020आंद्रे रसेलची 'या' स्पर्धेतून माघार!

आंद्रे रसेलची ‘या’ स्पर्धेतून माघार!

Subscribe

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू आंद्रे रसेल हा टी-२० क्रिकेटमधील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक मानला जातो. मागील आयपीएल मोसमात त्याने मोस्ट व्हॅल्युएबल खेळाडूचा पुरस्कार पटकावला होता. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मात्र त्याला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यातच दुखापतीमुळे आता तो दोन सामन्यांना मुकला आहे. तो मागील शनिवारी झालेला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना खेळला नव्हता, तर तो पंजाबविरुद्धच्या सामन्यातही खेळला नाही. या दुखापतीमुळे तो अजून आयपीएलमधून बाहेर पडला नसला तरी त्याने श्रीलंकेतील टी-२० स्पर्धा ‘लंका प्रीमियर लीग’मधून माघार घेतली आहे. रसेलप्रमाणेच फॅफ डू प्लेसिस, डेविड मिलर हे दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू, तसेच इंग्लंडचा फलंदाज डाविड मलाननेही लंका प्रीमियर लीग स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

मनविंदर बिसला स्पर्धेत खेळणार नाही

नोव्हेंबरमध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्ये मर्यादित षटकांची मालिका होणार आहे. त्यामुळे डू प्लेसिस, डेविड मिलर आणि मलान यांनी लंका प्रीमियर लीगमधून माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे भारताचा खेळाडू मनविंदर बिसलानेही या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याने या निर्णयामागचे कारण स्पष्ट केलेले नाही. लंका प्रीमियर लीग स्पर्धा २१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर या कालावधीत पार पडणार असून १५ दिवसांच्या कालावधीत २३ सामने होणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना १३ डिसेंबरला होणार असून १४ डिसेंबर हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -