Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा विराट भडकून म्हणाला 'हा तर असभ्य वर्तनाचा कळस'

विराट भडकून म्हणाला ‘हा तर असभ्य वर्तनाचा कळस’

'हा तर असभ्य वर्तनाचा कळस असून वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार नाही', अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपला राग व्यक्त केला आहे.

Related Story

- Advertisement -

‘हा तर असभ्य वर्तनाचा कळस असून वर्णद्वेषी टिपण्णी खपवून घेतली जाणार नाही’, अशा शब्दांत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने आपला राग व्यक्त केला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यावेळी भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी टिपण्णीचा सामना करावा लागला. याप्रकरणी सर्वच स्तरातून टीका होत असताना विराटने देखील ट्विटरद्वारे आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला विराट?

- Advertisement -

‘वर्णद्वेषी टिपण्णी ही कदापी सहन केली जाणार नाही. सीमारेषेवर अनेकदा अशा घटनांना सामोरे जावे लागले असून ही खूपच लाजीरवाणी बाब आहे. असभ्य वर्तनाचा हा कळस आहे. खेळाच्या मैदानावर, असं काही पहायला मिळल्यास वाईट वाटतं’, असं विराटनं म्हटलं आहे.

भारत-ऑस्ट्रेलियाच्या तिसऱ्या कसोटीच्या सामन्यात मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांच्यावर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिपण्णी केली होती. त्यानंतर चौथ्या दिवशी सिराजला पुन्हा एकदा अशा टिपण्णीचा सामना करावा लागला. यासंदर्भात भारतीय संघाने पंचांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर काहीवेळ सामना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. नंतर प्रेक्षकांमध्ये वर्णद्वेषीवरुन टिपण्णी करणाऱ्या सहा जणांना बाहेर काढण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा – तिसऱ्या कसोटीवर ऑस्ट्रेलियाची पकड; भारताला आणखी ३०९ धावांचे लक्ष्य


 

- Advertisement -