…आणि नेटिझन्सला आली धोनीची आठवण! भन्नाट ट्वीट्स व्हायरल!

वानखेडेवर टीम इंडिया पराभूत होत असताना ट्वीटरवर मात्र माही अर्थात महेंद्रसिंह धोनीने चांगलाच धुमाकूळ घातला होता!

Mumbai
dhoni trending

माही… अर्थात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि दोन विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय धुरंधरांचं नेतृत्व करणारा धुरंधर महेंद्रसिंह धोनी! २०१९चा विश्वचषक झाल्यापासून कुणीही माहीला मैदानावर खेळताना पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याच्या चाहत्यांची घोर निराशा जशी झाली आहे, तसंच सगळेच बुचकळ्यात देखील पडले आहेत. धोनीने याआधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची जाहीर केलेली आहे. मात्र, वनडे आणि टी-२० या प्रकारातून अजूनही धोनी निवृत्त झालेला नाही. पण गेल्या १० महिन्यांपासून मैदानावर नसलेला धोनी आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या निमित्ताने मैदानावर नाही, तर ट्वीटरवर धुमाकूळ घालून गेला!

धोनीचा ट्वीटरवर धुमाकूळ!

धोनीसाठी पर्याय म्हणून यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आलेला ऋषभ पंत जायबंदी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. या परिस्थितीमध्ये के. एल. राहुलवर यष्टीरक्षणाची जबाबदारी देण्यात आली होती. पण के. एल. राहुलच्या यष्टीरक्षक म्हणून मर्यादा स्पष्ट होत असतानाच ट्वीटरवर मात्र नेटिझन्स धोनीच्या नावाचा जाप करत होते. विशेषत: टीम इंडियाच्या फलंदाजीला घरघर लागलेली असताना भारताचा बेस्ट फिनिशर संघात नसल्याबद्दल ट्वीटरवर अनेकांनी नाराजी आणि खंत देखील व्यक्त केली होती. मैदानावर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ट्रेण्ड करत असताना ट्वीटरवर मात्र धोनी ट्रेंडिंगमध्ये होता. काही नेटिझन्सनी धोनीवर भन्नाट ट्वीट्स केले आहेत.


Ind vs Aus पहिली वनडे : भारताची दाणादाण, ऑस्ट्रेलियाकडून लाजिरवाणा पराभव!