SRH vs KXIP Live Update : पंजाबची अडखळती सुरुवात

आज आयपीएलमध्ये हैदराबाद विरुद्ध पंजाब असा सामना होत आहे. 

जॉनी बेअरस्टो

पंजाबने ३१ धावत २ विकेट गमावल्या.


२०२ धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या डावाची अडखळती सुरुवात झाली.


हैदराबादचा डाव गडगडला. मात्र, केन विल्यमसनने (नाबाद २०) काही चांगले फटके मारल्याने हैदराबादने २० षटकांत ६ बाद २०१ अशी धावसंख्या उभारली.


मनीष पांडे १ धाव करून बाद.


वॉर्नर पाठोपाठ जॉनी बेअरस्टोही माघारी परतला. त्याला ९७ धावांवर रवी बिष्णोईने पायचीत पकडले.


वॉर्नर आणि बेअरस्टोने १६० धावांची सलामी दिली.


लेगस्पिनर रवी बिष्णोईने वॉर्नरला (५२) बाद केले.


कर्णधार डेविड वॉर्नरनेही झळकावले अर्धशतक. ३७ चेंडूत पूर्ण केल्या ५० धावा.


हैदराबादच्या दीडशे धावा पूर्ण. १४ षटकांनंतर बिनबाद १५४ अशी धावसंख्या.


हैदराबादच्या १० षटकांत १०० धावा. वॉर्नर आणि बेअरस्टोची शतकी सलामी.


बेअरस्टोचे अर्धशतक २८ चेंडूत पूर्ण. ठरले यंदाच्या मोसमातील तिसरे अर्धशतक.


हैदराबादची पॉवर-प्लेच्या सहा षटकांनंतर बिनबाद ५८ अशी धावसंख्या. वॉर्नर आणि बेअरस्टो हे दोघेही २६ धावांवर नाबाद.


हैदराबादचे सलामीवीर वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली.


हैदराबादचा नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय.


दोन्ही संघांचा हा यंदाच्या मोसमातील सहावा सामना आहे. आतापर्यंत पंजाबला केवळ एक, तर हैदराबादला दोन सामने जिंकता आले आहेत.


आज आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब असा सामना होत आहे.